
Nashik News : छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन बुलंद तोफा असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंमध्ये काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली होती. हा वाद अखेर मातोश्रीच्या उंबऱ्यापर्यंत पोहचला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दोन्ही नेत्यांना पक्ष संकटात असल्याची जाणीव करुन दिलीच, शिवाय त्यांचे कानही टोचले असल्याची चर्चा आहे.मातोश्रीवर वाद मिटून 24 तास उलटत नाही,तोच पुन्हा एकदा ठाकरेंनी भरमेळाव्यात खैरेंचे नाव घेतलं आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुधवारी(ता.16) नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्धार शिबीर पार पडलं. यावेळी ठाकरे बोलत होते.ते म्हणाले,बाळासाहेबांच्या भाषणातही बबनराव घोलपांसह जुन्या नेत्यांचीही नावं होती.त्यात चंद्रकांत खैरेंचंही (Chandrakant Khaire) नाव आहे.काल परवा एक बातमी आली, खेरे नाराज,चालले.जा कुठे जाताय..जाताय असा सवालही ठाकरेंनी यावेळी केला.
ठाकरे म्हणाले, ही माणसं कुठं जाऊच शकत नाही.पण एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि पराचा कावळा करुन टाकायचा.चालले, पण कुठं चालले.आहेत सगळे माझ्यासोबतच आहे. आणि माझ्यासोबतच राहणार आहे,असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. एकप्रकारे ठाकरेंनी खेरैंना विश्वासतच घेतल्याचं दिसून आलं.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा नाशिक शहरात निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्हीही नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे अंबादास दानवे हे खैरे यांच्या पाया पडल्याचं दिसून आलं. याचवेळी दोन्ही नेत्यांनी अगदी सबुरीची भूमिका घेतली. तसेच एकमेकांना चिमटा काढण्याची संधीही सोडली नाही.
खैरेंनी मराठवाड्यातील आमच्या पक्षाचा मेळावा हा छोटा होता.त्यामुळे मला कदाचित बोलावलं नसेल,अशी टिप्पणी करतानाच दानवे यांनी आताच भाषण केले.त्यांनी भाषण केल्याप्रमाणे ते सर्वांशी बोलले, सर्वांशी चांगले वागले तर संघटना आणखी वाढेल,अशी अपेक्षाही व्यक्त केली.
तर अंबादास दानवेंनी माझ्याकडून कोणताही वाद कधीच नव्हता.मी त्यांचं दर्शन घेतलं.मी त्यांच्या पाया पडलो.आमच्यात मतभेद कधीच नव्हते.माझ्या मनात तरी मतभेद नव्हते.मी जे भाषणात जे बोललो तेच प्रत्यक्षात आणलं म्हणून मी गटप्रमुख या पदापासून ते विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत आलो असल्याचं सांगतानाच खैरेंनाही प्रत्युत्तर दिलं.यावेळी ते आमच्यात सर्वकाही आलेबल असल्याचंही सांगण्यास ते विसरले नाहीत.
मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मला बोलावले नाही म्हणून खैरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.दानवे मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत. पक्षाचा कार्यक्रम असला तरी माझ्याशी चर्चा करत नाहीत, असा थयथयाट खैरे यांनी व्यक्त करतानाच दानवेंची उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपण तक्रार करणार असल्याचंही म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.