
Nashik News : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. याच मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी यावेळी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि शिवजयंतीच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. तसेच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीशी आपण सहमत असल्याचेही म्हटलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठीच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला होता. तर राजभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करा अशी मागणी केली होती. राजभवनात इतकी जागा असून त्याच्या एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची मागणी केली होती. आता या मागणीवरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाना साधला आहे.
ठाकरे यांनी उदयनराजे भोसले यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर खरंच भाजपची आणि मोदींची श्रद्धा असेल तर त्यांना फक्त महाराष्ट्रात मर्यादित करायचं नसेल तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी द्या अशी मागणी केली आहे. तसेच अरबी समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक कधी होणार? असा सवाल करताना, स्मारकाबद्दल जी मागणी उदयनराजेंनी केली आहे. ती बरोबर आहे. तर महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत, असेही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
याआधी राज्यपाल पदावर तर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून कशाला पाहिजे राज्यपालांना थाट? राजभवनाच्या जागी महाराजांचा इतिहास सांगणारं स्मारक उभं करा अशी मागणी शिवसेनेची आहे. त्यांचा आणि जनतेचा तसाही संबंध येत नसतो. तर एका मंत्र्याकडे दोन तीन बंगले असून द्या त्यापैकी त्यांना एक. आणि जगाला हेवा वाटेल असं स्माकर त्या जागेवर उभं करा असेही ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान ठाकरे यांनी राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्यावरून देखील हल्लाबोल केला असून आपला गुजरात्यांबद्दल राग नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पण तिथे तिथे बसलेल्या त्या दोघांना महाराष्ट्राची कल्पना नाही. जे पंडित जवाहलाल नेहरू ओपन कारमधून फिरायचे त्यांना मात्र महाराष्ट्रात बंदिस्त कार वापरावी लागत होती. यामुळे येथे कोणाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही, असाही इशारा ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.