Raj Thackeray: 1952 मध्ये जन्माला आलेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लगतात! निष्ठावंतांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी भाजपला डिवचलं

Raj Thackeray Nashik Speech : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे युतीचा पहिली संयुक्त सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लोकांना संबोधित केलं.
Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

Raj Thackeray Nashik Speech : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची संयुक्त सभा पार पडली. शिवसेना-मनसेची ही महापालिका निवडणुकीतील ही पहिलीच सभा होती. यावेळी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी देणाऱ्या भाजपवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान भाजपनं केला असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Kolhapur Election: ...मग विरोधक जाहीरनाम्यासाठी निधी आणणार कुठून?; महायुतीच्या नेत्यांची कुरघोडी, कर्तव्यनामा जाहीर

राज ठाकरे म्हणाले, "आज अनेक वर्षे रखडलेल्या निवडणुकांची कारण कोणालाही सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत. चार वर्षांपूर्वी मुदत संपूनही या महापालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या? याचं उत्तर या सरकारनं दिलं पाहिजे. इतक्या वर्षांनी आता निवडणुका होत आहेत तर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रात सुरु आहे, कोण कुठे चाललंय? काय चाललंय? हेच कळत नाहीए. प्रत्येकाला विचारावं लागतं आज कुठे? सगळे वेडेपिसे झाले आहेत"

Raj Thackeray
Rohit Pawar: अजित पवार म्हणजे KGF मधील रॉकीभाई! रोहित पवारांनी उधळली स्तुतीसुमनं

एकानं छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला हिसकावून घेतला आणि गिळून टाकला. कोणत्या थराला गेल्या आहेत निवडणुका. या महानगरपालिकेत ६० ते ७० उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात! तिकड्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण तुम्ही त्यांना देणार नाही? काही वेळा दहशतीतून तर काही वेळेला पेसे देऊन. कल्याण-डोंबिवलीत एका प्रभागात एकाच घरातले तीन जण उभे आहेत. त्यांना १५ कोटी रुपयांची ऑफर दिली, इतके पैसे येतात कुठून? या लेव्हलला परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची, असा सवाल राज ठाकरेंनी भाजपला विचारला.

Raj Thackeray
Devendra Fadnavis: बिनविरोध निवडणुकांवर फडणवीसांचा अजब तर्क! म्हणाले, किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात...

एकतर उभं राहू द्यायचं नाही माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची, अशा वातावरणात तुम्ही निवडणुका घेता. नाशिकमध्ये देखील तुमच्याकडं जुनी माणसं होती ना? १९५२ साली जन्माला आलेला पक्ष जनसंघ नावानं त्याला २०२६ मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होती ना? मग दुसऱ्यांची पोरं कशाला कडेवर घेऊन नाचताय. याचं कारण जो पक्षासाठी काम करतोय त्याला शून्य किंमत आहे.

Raj Thackeray
Nagpur Election: भाजपचा बंडखोरांना मोठा झटका! तब्बल 32 जण एकाचवेळी निलंबित

एखाद्या मतदारसंघात तीन-चार चांगले उमेदवार असतात त्यांपैकी एखादा-दुसरा निवडावा लागतो हे मी समजू शकतो. पण जी लोक इतकी वर्षे सतत काम करतात त्यांना पूर्णपणे बाजुला सारून त्याजागी दुसऱ्या कोणाला तरी उभं करतात हा त्या कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? बाहेरुन माणसं लागतात तुम्हाला. बरं ती आणतात तर त्यांना रात्री पैसे पोहोचवले जातात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com