Raj Thackeray : 'महाजनांपेक्षा लाकूडतोड्या बरा, हे झाडांआधी कार्यकर्ते छाटतात अन् बाहेरून मागवलेली झाडे...'; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी भाजपला घेरलं

Raj Thackeray Nashik Speech : '2017 ला फडणवीस नाशिकला आले आणि नाशिक दत्तक घेतो म्हणाले. नाशिककर त्या विधानाला भुलले आणि मनसेने केलेली कामं विसरले. पण दत्तक घेतो म्हणलेला हा बाप पुन्हा कधी नाशिककडे फिरकलाच नाही', अशा शब्दात राज यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
Girish Mahajan, Raj Thackeray
Raj Thackeray addresses a joint Shiv Sena–MNS rally in Nashik, strongly criticising the BJP over the controversial Tapovan tree cutting issue ahead of civic polls.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 10 Jan : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची संयुक्त प्रचारसभा शुक्रवारी (ता.09) आयोजित करण्यात आली होती. या सभेतून दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपवर सडकून टीका केली.

याच सभेतून राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून वादात आणि चर्चेत असलेल्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लोबोल केला. खासकरून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, 'यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनांपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत.'

Girish Mahajan, Raj Thackeray
Pune Election: संक्रांतीच्या नावाखाली मतांच्या खरेदीचा बाजार; प्रशासनानं झाकून घेतले डोळे

तर यावेळी राज यांनी मनसेची सत्ता असताना जो कुंभमेळा पार पडला त्या काळात एकही झाड न तोडता जागतिक स्तरावर कौतुक होईल, असा कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला असं सांगितलं. शिवाय आता वृक्षतोड करून ही जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचे नियोजन सुरू असल्याचा आरोप करत साधुसंत घरी गेल्यानंतर ही जमीन कुणाला द्यायची, हे यांचे आधीच ठरलेलं असतं असा दावाही राज यांनी केला.

Girish Mahajan, Raj Thackeray
Uddhav Thackeray : 'पक्षात घेण्यासाठी यांना सलीम कुत्ता, बिल्ली, उंदीर चालतात, पण भाजपचे आमदार रडतात...', नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, 2017 च्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, 2017 ला फडणवीस नाशिकला आले आणि नाशिक दत्तक घेतो म्हणाले. नाशिककर त्या विधानाला भुलले आणि मनसेने केलेली कामं विसरले. पण दत्तक घेतो म्हणलेला हा बाप पुन्हा कधी नाशिककडे फिरकलाच नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com