Shivsena Nashik convention : 'भाजपमुक्त श्रीराम' ; उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये मोठी घोषणा

Uddhav Thackeray in Nashik : त्यांच्या चितेवर कोणी रडणार नाही, उध्दव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या महाअधिवेशनात थेट भाजपला अंगावर घेतले आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम कुणा एकाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला 'भाजपमुक्त जय श्रीराम' अशी घोषणा द्यावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. एवढेच नाही तर रामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे काढायचे आहेत, असे थेट सुनावले.

मी 2018 मध्ये अयोध्येला (Ayodhya) गेलो होतो. मोदी (Narendra Modi) गेले नाहीत. त्यावेळी शिवनेरीची माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. त्याच्या आधी फडणवीसांसारखे कधी गेले असतील तर माहीत नाही. मात्र या दौऱ्यानंतर सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निर्णय आला, असा टोला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackery) लगावला.

Uddhav Thackeray
Shivsena Nashik convention : 'ते' रावण आणि 'हा' राम... संजय राऊत कुणाला म्हणाले?

आज श्रीरामांचे नाव घेतात त्यांच्यात श्रीरामांचा एक तरी गुण आहे का? मोदी आता म्हणतात समर्थ भारत बनवायचा आहे. मग 10 वर्षांत काय केले, याचा हिशोब द्या. पाहिले पाच वर्षे जगभर फिरले. 'कालचा इव्हेंट झाला. राम की बात हो गयी अब काम की बात करो', असे आव्हान ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपला (BJP) दिले. त्याचवेळी त्यांनी शिवसेना पळवली त्यांचा राजकीय वध करावा लागेल, असा इशारा दिला.

आम्ही भ्रष्टाचारी आहोत, असे म्हणता मात्र, त्याच शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही दिल्ली गाठली आणि आता आमच्यावर आरोप करतात. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'सरकारनामा'ने (Sarkarnama) उघड केलेल्या अॅम्ब्युलन्स घोटाळ्याचा जाब सरकारला विचारला. त्याचवेळी पीएम केअर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनर्उच्चार केला. आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढू आणि लवकरच तुरुंगात टाकू, असा इशाराही ठाकरेंनी दिला. 30 वर्षे भाजपसोबत राहून आम्ही त्यांच्यासारखे झालो नाहीत, तर काँग्रेसची साथ दिल्याने काय फरक पडणार, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित करत हिंदुत्व सोडले नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी सुरेश भटांची एक कविता सादर केली.

'हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही

दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही

हे खरे की आज त्यांनी, घेतले सारेच ठेके

पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही

असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या कवितेच्या माध्यमातून विरोधकांना दिला.

(Edited by Avinash Chandane)

Uddhav Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary : बिनधास्त बाळासाहेब : भाजपाला गोचीडाची उपमा आणि युती तोडण्याची धमकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com