Bal Thackeray Birth Anniversary : बिनधास्त बाळासाहेब : भाजपाला गोचीडाची उपमा आणि युती तोडण्याची धमकी

Balasaheb Thackeray Jayanti : तुम्ही देश सांभाळा महाराष्ट्र आम्ही सांभाळू...
Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath Munde
Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath MundeSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray Birth Anniversary News in Marathi : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या बिनधास्त आणि भीडस्त स्वभावासाठी ओळखले जातात. हिंदूत्वासाठी समविचारी पक्ष म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी युती केली. शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्रात आपलं बस्तान बसवणाऱ्या भाजपने ताकद वाढताच शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखठोक भूमिकेमुळे आणि निर्भीड स्वभावाने भाजपची डाळ कधी शिजू दिली नाही.

Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath Munde
Balasaheb Thackeray Birthday: बाराव्या वर्षी घेतला बाळासाहेबांकडून गुरूमंत्र!

हा प्रसंग होता 1995 च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीचा. जागावाटपासंदर्भात शिवसेना-भाजप युतीची बोलणी सुरू होती. भाजपने अतिरिक्त जागांची मागणी केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे प्रचंड संतापले. हा संताप त्यांनी 1994 च्या मुंबई येथील शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात जाहीरपणे व्यक्त केला. भाजपचा थेट गोचीड असा उल्लेख करीत बाळासाहेबांनी थेट युती तोडण्याची धमकीच देऊन टाकली.

'गोचीड म्हणून चिकटलात, दूध प्या पण रक्त पिण्याचा प्रयत्न कराल तर ते सहन करणार नाही,' अशा ठाकरे बाण्यात बाळासाहेबांनी तेव्हाच्या भाजप नेत्यांना ठणकावले होते. एवढेच नाही तर युती तुटलीच तर शिवसेनेचे सरकार एकट्याच्या बळावर आणणार का? असा सवालही त्यांनी शिवसैनिकांना करत 'एकला चलो' ची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली होती.

Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath Munde
Bal Thackeray Birth Anniversary: भुईमुगाच्या शेंगा अन् 'दोराबजी'बिर्याणीवर बाळासाहेब ताव मारायचे!

महाराष्ट्रात केवळ हिंदूत्वासाठी आणि देशाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही भाजपसोबत युती केली आहे, असे स्पष्ट करीत तुम्ही देश सांभाळा महाराष्ट्र आम्ही सांभाळू, अशी सडेतोड भूमिका बाळासाहेबांनी या सभेतून मांडली. युतीची बोलणी कुठे अडली हे सांगताना बाळासाहेब म्हणाले, 'भाजप ज्या जागा हरला आहे, त्या आम्हाला लढू द्या,' अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली. हे सांगताना बाळासाहेबांनी, 'आपण मित्र आहोत, सारखं सारखं तुम्ही पडणं बरं दिसतं का? कधीतरी निवडणुकीत आम्हालाही पडून पाहू द्या,' असा सणसणीत टोला भाजपला लगावला होता.

Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath Munde
Balasaheb Thackeray Jayanti 2024: आई तुळजाभवानीवरील नितांत श्रद्धा पण अधुरे राहिलेलं बाळासाहेबांचं 'ते' स्वप्नं!

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करणाऱ्या भाजपने गोव्यात मात्र शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात समाचार घेतला. दार फोडून गोव्यात प्रवेश करू, अशी धमकीच बाळासाहेबांनी भाजपला दिली होती. 'महाराष्ट्रात तुमच्यापेक्षा शिवसेनेची ताकद आणि पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. आमचा हात धरूनच तुम्ही मोठे झाला आहात ना, अन्यथा तुमचे महाराष्ट्रात दहा खासदार तरी निवडून आले असते का?' असा सवाल करत जागावाटपावरून ताणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटकारले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'नाही म्हणायला तुमचाही आम्हाला फायदा झाला हे आम्ही नाकारत नाही. पण गोचीड म्हणून दूध पीत असाल तोपर्यंत ठीक आहे, रक्त पिणार असाल तर मात्र सोडणार नाही,' असा सडेतोड इशारा बाळासाहेबांनी दिला होता. त्यानंतर 1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप (BJP) युतीचे सरकार आलं. मुख्यमंत्रिपदी मनोहर जोशी, तर उपमुख्यमंत्रिपदी गोपिनाथ मुंडे यांची निवड करण्यात आली.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Balasaheb Thackeray with Manohar Joshi, Uddhav Thackeray, Gopinath Munde
Balasaheb Thackeray Birth Anniversary : ...अन् बाळासाहेबांनी शरद पवारांसह भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय गुंडाळावा लागला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com