Uddhav Thackeray News : शिवसेनेची स्थापना भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही; ठाकरेंनी सुनावले

Jalgaon Politics : आम्ही काँग्रेससोबत गेलो, तर शिवसेनेची काँग्रेस होणार नाही.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : मुंबईत I.N.D.I.A.आघाडीच्या बैठकीपूर्वी पोस्टर वॉर झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह पोस्टर लावले होते.'मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही,' असा मजकूर त्यावर होता. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. "शिवसेनेची भाजपसोबत युती होती तेव्हा जशी शिवसेनेची भाजप झाली नाही, तशी शिवसेनेची काँग्रेसही होणार नाही," अशा शब्दांत ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली.

"भाजपसोबत गेलो म्हणून शिवसेनेची भाजप झाली नाही, तसे आम्ही काँग्रेससोबत गेलो तर शिवसेनेची काँग्रेस होणार नाही. अजूनही शिवसेना तशीच आहे. शिवसेनाप्रमुख भाजपला 'कमळाबाई' म्हणाले होते, आम्ही आताही तेच म्हणतोय, शिवसेनेची स्थापना भाजपची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही," असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar News : पाटेकरांनी वाघनखांवरून मुनगंटीवारांचा काढला 'कोथळा'; मुनगंटीवार म्हणतात, 'नानांनी माझं कौतुक केलं...

G20 शिखर परिषदेवरून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी 'इंडिया'चा उल्लेख टाळत "भारत"असे संबोधले. त्यावर ठाकरे म्हणाले, "आपल्या देशाचे नशिब आहे की, मोदी 'भारत' तरी म्हणतात, मला वाटले की ते देशाला स्वत:चे नाव देतात की काय ? आगामी निवडणुकीत आम्ही पण देशात बदल करणार आहोत, आम्ही पंतप्रधान बदलणार, दहा वर्षांत मोदी सरकारने काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Ajit Pawar News : अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, "बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्यासाठी…"

"राज्यातील सत्ताधारी सारखे दिल्लीत जातात, निर्णय घेण्यासाठी त्यांना मुंबईतून दिल्लीला जावे लागते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख या दोनच व्यक्तींनी मुंबईत बसून राजकारण केले. त्यांना दिल्लीत जावे लागले आहे. आमचं राजकारण 'मातोश्री'वरून होते," असा टोला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लगावला.

"शिवसेना सोडून गेलेले गद्दार मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, कारण त्यांच्या मनात भीती आहे, ती लोकांमध्ये गेलो तर लोक चपलांनी मारतील. खानदेशातील लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत, ही जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असे राऊत म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com