संजय राऊत यांचा ट्रॅपमधून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावे!

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ओबीसी आरक्षणाला पवार व ठाकरेंचा विरोध होता.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शिवसेना (Shivsena) वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्रॅप मधून बाहेर पडावे, असा सल्ला देताना भाजप (BJP) प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी ओबीसी (OBC) आरक्षणाला अजित पवार (Ajit Pawar) व उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा आरोप आज येथे केला. (BJP leader bavankule claims thatNCP leaders are anti OBC reservation)

Chandrashekhar Bavankule
Shivsena; जनतेच्या भावना आजही शिवसेनेसोबतच

ते म्हणाले, वृत्तपत्रातील मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. तेच प्रश्न विचारणार व तेच उत्तर देणार, बंद खोलीत घेतलेली ही मुलाखत मॅच फिक्सिंगच आहे.

Chandrashekhar Bavankule
उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदाराच्या भगिनीची निष्ठेची मोठी भेट!

ते म्हणाले, ठाकरे यांना मुलाखत द्यायची होती तर प्रसिद्धी माध्यमांसमोर द्यायला हवी होती. ठाकरे यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचे नेते ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. आम्हीच ओबीसी नेते आहोत. असे दाखवण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी भुजबळ, वडेट्टीवार यांचे नाव घेत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ लावू नये. राज्याच्या विकासासाठी हजार वेळा जावे लागले तरी ते जातील. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिखावापणा बंद करून विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ, उत्तर महाराष्ट्र वैज्ञानिक विकास महामंडळ बंद का केली, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे, पवार झारीतील शुक्राचार्य

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी षडयंत्र रचले होते. ओबीसींचा डेटा संकलित करण्यासाठी निरगुडे आयोगाने ४३५ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती मागणी फेटाळून लावली. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम केले आहे. त्यावर महाविकास आघाडीचे नेते राजकीय पोळी भाजत असून ठाकरे व पवार हेच ओबीसी आरक्षण विरोधातील झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप श्री. बावनकुळे यांनी करताना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याचा दावा केला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com