Unmesh Patil Politics: 'नार-पारचे पत्र हा तर फडणवीसांचा निवडणूक जुमला'

Narpar Project : माजी खासदार उमेश महाजन यांनी नारपार प्रकल्पासाठी सुरू केला लढा. राज्य सरकार आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगाव आणि गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.
Unmesh Patil Politics
Unmesh Patil PoliticsSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Unmesh Patil: नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पावरून राजकारण तापले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात या प्रकल्पावरून शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकार विरोधात नाराजी आहे. या संदर्भात खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शेकडो ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले. नार-पारची योजना नाकारणे हा खानदेश वर अन्याय आहे. त्या विरोधात आता लढा सुरू झाला आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ( Shivsena UBT) माजी खासदार उन्मेष महाजन (Unmesh Mahajan) यांनी काल शेतकऱ्यांसमवेत आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगाव आणि गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

हा प्रकल्प होऊ नये यासाठीच राज्य सरकार काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. नार-पारचे पाणी गुजरात राज्याला जाणे म्हणून राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. मात्र त्यामुळे खानदेशच्या (Khandesh) पुढच्या पिढी पुढे पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. त्यासाठी आजच सगळ्यांनी जागरूक व्हावे लागेल. त्यासाठी आम्ही आरपारची लढाई लढणार आहोत.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी केलेल्या कारस्थानाचा निषेध करीत, या संदर्भात आता राज्य सरकार विरोधात आरपारची लढाई होई, अशी घोषणा माजी खासदार पाटील आणि सर्व शेतकऱ्यांनी यावेळी केली.

Unmesh Patil Politics
Girish Mahajan Politics : नाशिकच्या दंगलीत खासगी पिस्तुलाचा वापर? चर्चेला फुटले तोंड...

माजी खासदार पाटील म्हणाले, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील (C. R. Patil) हे देशाचे नव्हे तर गुजरातचे मंत्री असल्यासारखे वर्तन करीत आहेत. त्यांनी नार-पारचे पाणी गुजरातला वाहून जावे, म्हणून नारपार प्रकल्पाला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

नदीजोड प्रकल्प हा राष्ट्रीय विषय आहे. अशा स्थितीत या प्रकल्पासाठी पाठपुरावा न करता राजकीय डावपेच आखण्यात राज्यातील नेते व्यस्त आहेत. त्यांनी याबाबत निवडणुकीच्या तोंडावर राज्यपालांचे पत्र व्हायरल केले आहे.

Unmesh Patil Politics
Yuvraj Karankal Politic : काँग्रेस मैदानात, समाजकंटकांचा उद्देश असफल करा!

राज्यपालांचे हे पत्र म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा निवडणूक जुमला आहे. असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी नारपार गिरणा खोरे बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड रवींद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, आम आदमी पार्टीचे ॲड राहुल जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे गोकुळ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, काँग्रेस नेते अनिल निकम यांसह विविध प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com