Yuvraj Karankal Politic : काँग्रेस मैदानात, समाजकंटकांचा उद्देश असफल करा!

Yuvraj Karankal Politic : धुळे बंद दरम्यान बेरोजगारांना चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणाऱ्यांना अयशस्वी करण्याचे आवाहन. बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची झळ हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजांना बसली आहे. अत्यंत मानवी गोष्टी घडत आहे. त्याचा निषेध प्रत्येकाने केला पाहिजे.
Dhule Band Congress
Dhule Band CongressSarkarnama
Published on
Updated on

Dhule Congress News: बांगला देशातील घटनांच्या विरोधात आज धुळे शहरात बंद पुकारण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या बंदची जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अलर्टवर आहेत. राज्यातील काही शहरात बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. या बंद दरम्यान जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे प्रयत्न झाले.

याबाबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. त्यांनी याविषयी पोलिसांना निवेदन देत जागृत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलीस यंत्रणांनी समाजकंटकांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी करण्यात आली. बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची झळ हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजांना बसली आहे. अत्यंत मानवी गोष्टी घडत आहे. त्याचा निषेध प्रत्येकाने केला पाहिजे.

मात्र हा निषेध करताना काही राजकीय आणि समाजकंटकांकडून बेरोजगारांना चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून आता व सुव्यवस्थेला धोका पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. सामान्य नागरिकांना त्याची झळ बसते. शहरातील वातावरण बिघडते. सगळ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळे अशा घटनांपासून युवक आणि बेरोजगारांनी सावध राहावे. शहर आपले आहे. या शहराची शांतता कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आपणच जागरूक राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करणकाळ (Yuvraj Karankal) यांनी केले आहे.

Dhule Band Congress
Radhakrishna Vikhe Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचे विधान, मंत्री विखेंचा राजकारण करणाऱ्यांना इशारा...

बांगलादेशातील हिंसक घटना आणि आंदोलनाची झळ त्या देशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक सामुदायांना बसते आहे. अतिशय अमानवीय घटना घडत आहेत. त्याचा सगळ्यांनी निषेध करावा. या खेदजनक घटना रोखण्यासाठी त्या देशातील सरकारने काम करण्याची गरज आहे. त्याचवेळी या घटनांचा लाभ घेऊन काही समाजकंटक आणि समाजविरोधी शक्ती वातावरण तापविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. बेरोजगार युवकांना चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन दिले जात आहे. याबाबत पोलिसांनी (Police) दक्ष राहण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या या घटना व त्याचे पडसाद चिंताजनक आहेत.

Dhule Band Congress
Radhakrishna Vikhe Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचे विधान, मंत्री विखेंचा राजकारण करणाऱ्यांना इशारा...

त्यामध्ये काही संघटना आणि समाजविरोधी शक्ती जाणीवपूर्वक राज्यातील व देशातील वातावरण कसे बिघडेल असे प्रयत्न करीत असावेत, असा संशय येतो. या स्थितीत पोलिसांची जबाबदारी वाढते. धुळे शहरातील (Dhule) वातावरण आणि सामाजिक स्थिती पाहता पोलिसांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी काँग्रेससह सर्व सामाजिक संघटना आणि नागरिक पोलिसांना मदत करण्यास तयार आहेत. मात्र कोणत्याही स्थितीत समाजकंटकांचा शांतता बिघडविण्याचा हेतू सफल होता कामा नये.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक श्रीकांत देवरे (Shrikant Deore) यांना निवेदन देऊन चर्चा केली. शहरातील शांततेसाठी आता काँग्रेस मैदानात उतरली आहे. यावेळी रमेश श्रीखंडे पितांबर महाले हरिभाऊ चौधरी भीमसेन अहिरे यांसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com