Vaishali Suryawanshi : कार्यकर्त्यांना निष्ठेच्या अनाभाका देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र!

Vaishali Suryawanshi BJP Entry : सत्तेत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाही. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पक्षाला राजकीय शॉक दिला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी यांचा भाजप प्रवेश सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
Vaishali Suryawanshi joining BJP
Vaishali Suryawanshi joining BJP in the presence of Ravindra Chavan has sparked debate in Pachora-Bhadgaon constituency, impacting Shiv Sena’s election strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 20 Aug : सत्तेत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाही. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पक्षाला राजकीय शॉक दिला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी यांचा भाजप प्रवेश सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार किशोर पाटील हे शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात त्यांच्या भगिनी सूर्यवंशी यांनी चांगलेच रान पेटवले होते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशी राजकीय लढाई रंगली होती.

विधानसभेच्या निवडणुकीत सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिवसेनेचे गोडवे गायले होते. शिवसेना ठाकरे पक्षाने दिवंगत नेते माजी आमदार आर. ओ. पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना भरभरून दिले. त्यामुळे शिवसेना सोडून जाणे आर. ओ. आबा यांच्या आत्म्याला दुःख देणारे आहे, असे सांगत त्यांनी भाऊ आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती.

Vaishali Suryawanshi joining BJP
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

या पार्श्वभूमीवर मंगळवारी सूर्यवंशी यांनी मुंबईत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अचानक झालेला हा प्रवेश अनेकांना राजकीय धक्का ठरला. विशेषता पाचोराभडगाव मतदार संघात अनेकांना त्यावर विश्वास बसला नव्हता.

कालपासून मतदारसंघात समाज माध्यमांवर सूर्यवंशी यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबियांशी एकनिष्ठ राहण्याची घेतलेली शपथ आणि भाषण असलेला हा व्हिडिओ व त्यावरील प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्ष अशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना धक्का मानला जातोय.

Vaishali Suryawanshi joining BJP
Kumbh Mela Controversy: छगन भुजबळ, एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह; भाजपची कोंडी! कुंभमेळाव्याच्या नियोजनावरून वाद पेटणार!

यानिमित्ताने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विशेषता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सूर्यवंशी यांनी राजकीय लाभ हानी याचा विचार करून भाजपची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना येत्या निवडणुकीत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार पाटील दुसरीकडे भाजपच्या त्यांच्या भगिनी सूर्यवंशी आणि तिसरा घटक शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यामध्ये आगामी निवडणुकीत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com