
Vanchit Bahujan Aghadi : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून इतर सर्वांसोबतच वंचित बहुजन आघाडी युती करण्यास तयार आहे. त्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर निर्णय घेतील असे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
नाशिकमध्ये काल वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्यानंतर सुजात आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती संदर्भातील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, भाजप व भाजपबरोबर असलेले मित्र पक्ष वगळून इतर पक्षांसोबत जाण्यास वंचित आघाडी तयार आहे. मात्र, स्वाभिमान जपूनच युती किंवा आघाडी केली जाईल असही ते म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच युती-आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते म्हणाले आमची लढाई स्वाभिमानाची आहे. आम्ही भाजपशी लढा देत असून यापुढील काळातही तो सुरुच राहील. त्यामुळे भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सोडून इतर पक्षांबरोबर युती करण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही भाजपचे मित्रपक्ष आहेत. आम्ही या मित्रपक्षांसोबतही युती करणार नाही. भविष्यात राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट किंवा अन्य कोणताही पक्ष महायुतीसोबत गेला तर आम्ही त्यांच्याशी युती किंवा आघाडीचा कोणताही विचार करणार नाही. तसेच निवडणुकीत कोणाबरोबर जायचे की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय आमचे नेते घेतील. त्याचा सर्वस्वी निर्णय हा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोडला असल्याचेही त्यांनी (Sujat Ambedkar) स्पष्ट केले.
"मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही आम्ही युती किंवा आघाडी करण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले होते. मात्र, त्यावेळी आमच्या पदाधिकाऱ्यांना तासन्तास थांबवून ठेवणे, ४८ जागांपैकी केवळ एका जागेवरच चर्चा करणे अशा गोष्टी घडत गेल्यामुळे आम्ही आमचा आत्मसन्मान जपला. त्यामुळे पुढील काळात युती किंवा आघाडीचा विचार करताना आमच्यासह आमचे कार्यकर्तेही स्वाभिमान कायम राखतील, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले."
"अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्वांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मुंबईत स्थानिक लोकल रेल्वेतून पडून चार जणांनी जीव गमावला, तर बंगळुरूमध्येही एक गंभीर अपघात घडला. या सर्व घटनांमागे शासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.