Nashik Political : ठाकरेंची शिवसेना करणार प्राणप्रतिष्ठा सोहळा 'हायजॅक'

Cooperation from Administration : शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन ; प्रशासनाकडून सहकार्याची मागणी.
Nashik
NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political : राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई तीव्र होणार आहे. भाजपकडून हा सोहळा 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधाकडून होत आहे. दुसरीकडे भाजपला धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सरसावले आहेत. नाशिक शहरात प्राण प्रतिष्ठेचा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा करण्यात येणार असून भाजपचा सोहळा ठाकरे गट 'हायजॅक' करण्याच्या तयारीत आहे.

त्याच अनुषंगाने 22 जानेवारीला नाशिक मधील काळाराम मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी रोजी ड्राय डे घोषित करावा तसेच चिकन व मटन विक्रीची दुकाने बंद ठेवावी. सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, या आशयाचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.

Nashik
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा पतंग उडणार? की कटणार...

शिवसेना ठाकरे गटातर्फे 22 जानेवारीला मंगलमय वातावरणात गोदातीरी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती सुद्धा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी विद्युत रोषणाई तसेच दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यामुळेच या दिवशी ड्राय डे घोषित करणे गरजेचे आहे. सर्व चिकन व मटन विक्रीची दुकाने बंद ठेवावीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिडको आणि सातपूर परिसरातील अवैध मांस विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. त्या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांना व शाळाना सुट्टी जाहीर करावी. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून महानगर परिसरात पोलीस गस्त वाढवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेना उपनेते सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, महानगर समन्वयक, देवा जाधव, नीलेश साळुंके, सुनील जाधव, मसूद जिलानी, ईमरान तांबोळी, राजेंद्र वाकसरे, दीपक वाघ यांनी निवेदन दिले. नंतर या आशयाचे आणखी एक निवेदन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनाही देण्यात आले.

ठाकरे गट दिवाळी सारखा सण साजरा करणार...

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या शुभ मुहूर्तावर अयोध्येप्रमाणेच नाशिक शहरात ठाकरे गटाकडून फटाक्यांची आतषबाजी, दीपोत्सव, विद्युत रोषणाई व राम मंदिरात आरती करून दिवाळी सारखा सण साजरा करण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला येत आहे. ते काळाराम मंदिरात आरती करतील. याकरिता प्रशासनाने देखील हातभार लावावा म्हणून निवेदन देण्यात आले.

(Edited by Amol Sutar)

Nashik
Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar : तानाजी सावंतांनी खासदार ओमराजेंवर का सोडला बाण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com