Jalgaon BJP Politics: एकनाथ खडसेंच्या घरवापसीला विरोध; गिरीश महाजन लागले कामाला? 'ते' तीन नेते तातडीने मुंबईला रवाना!

Eknath Khadse BJP Rejoin, Vinod Tawde Meeting, Jalgaon BJP Politics: विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर खडसे यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना वेग आला आहे. जळगाव भाजपमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Eknath-Khadse-Girish-Mahajan
Eknath-Khadse-Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse BJP Rejoin: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर त्याचे पडसाद जळगावच्या राजकारणात उमटले. त्यामुळे जळगावमध्ये भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. या भेटीमुळे पुन्हा एकदा खडसे यांच्या भाजप घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे पडसाद जळगावच्या राजकारणात उमटत आहेत.

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर तावडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र जळगाव भाजपचे नेते गिरीश महाजन कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी तयारी सुरू केली.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
Eknath Khadse News: मोठी बातमी: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा पुढचा राजकीय धक्का; ठाकरेंच्या भेटीसाठी थेट गाठली 'मातोश्री'

जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांना तातडीने मुंबईत पाचारण केल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने सर्व आमदार मुंबईतच होते. या पार्श्वभूमीवर जळगावच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्यात खडसेंविरोधात मोर्चे बांधणीला बळ मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्म मध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे दोघेही मंत्रिमंडळात होते. फडणवीसांचे अंतर्गत विरोधक म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. खडसे यांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन तशी व्यवस्थाही केली होती. मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्या फिल्डिंगमुळे खडसे यांचा भाजप प्रवेश टळला होता.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
Maharashtra Politic's : मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत : पवारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंशी अर्धा तास चर्चा...

आता खडसे यांच्या नव्याने भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. विनोद तावडे आणि खडसे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्याचा उपयोग खडसे आपल्या घरवापसीसाठी करण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com