Narhari Zirwal News : आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही!

We will not allow Trible reservation will not be affected at all-धनगर समाजाला आदिवासींच्या वाट्यातील आरक्षण कदापि देता कामा नये, असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Dhangar reservation issue : धनगर समाजाला आदिवासी जमातींतील आरक्षण दिले जाता कामा नये. त्यांना राज्य शासनाने स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसे न झाल्यास राज्यभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी दिला. (Trible organization came togather against Dhangar reservation at Nashik)

येत्या १२ ऑक्टोबरला नाशिक (Nashik) येथे आदिवासींचा (Trible) मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाने (Maharashtra) आमच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेतल्यास राज्यभर मोर्चे काढले जातील, असा इशारा देण्यात आला.

Narhari Zirwal
Sambhajiraje News : अजित पवारांनी विचार बदलला असेल, तर माझं ऐकलं अस समजू!

या बौठकीत पाच प्रमुख विषयांवर चर्चा झाली. त्यावर समाजाच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासनाने त्याबाबत तातडीने दखल घेऊन कारवाई करावी. यामध्ये राज्य शासनाने सुरू केलेले छुपे खासगीकरण, आदिवासी शाळा, शासकीय आश्रमशाळांचे खासगीकरण, सध्या राज्यातील जे बोगस आदिवासी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे, धनगर समाजाला आदिवासी जमातीतील आरक्षणास प्रखर विरोध आणि मणिपूर प्रकरणावर आंदोलन केलेल्या आदिवासी युवकांविरोधात पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.

या वेळी झिरवाळ म्हणाले, आजही अनेक भागातील आदिवासी समाज विकासापासून वंचित आहे. त्यातच आदिवासी आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. धनगर समाजाला शासनाने आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे.

Maratha Reservation : आरक्षणासाठी सर्वेक्षण करावे लागेल, त्यावर कोणीच बोलत नाही!

एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, राज्यभरात धनगर समाज बांधव आक्रमक आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी धनगर संघटनांकडून केली जात आहे. मात्र, आदिवासी समाज संघटनांकडून विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली.

Narhari Zirwal
Jalgaon Politics: ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन जळगावकरांसाठी निरूपयोगी?

या बैठकीला निवडक संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मोठ्या संख्येने प्रतिनिधी आले होते. त्यात आमदार झिरवाळ, समन्वयक राम चौरे, आमदार दौलत दरोडा, शिवाजीराव ढवळे, अशोक बागूल, कैलास शार्दूल, देवा वाटाणे, लकी जाधव, राजाभाऊ वागळे, चेतन खंबाईत, के. के. गांगुर्डे, माजी जि. प. चौधरी, रंजनाताई भानसी, एन. डी. गावित, राजेंद्र गायकवाड आदींनी विविध सूचना केल्या.

Narhari Zirwal
Nashik Onion Politics : कांदा प्रश्न खासदार, आमदारांची झोप उडवणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com