'धनुष्यबाण' गोठवणे हे निवडणूक आयोगाचे मॅचफिक्सिंग : सामनातून टिकास्त्र!

Shivsena : "शिवसैनिक जिद्दीने पेटून उठेल, याच जिद्दीच्या जोरावर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक जिंकणारच."
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. मात्र काही अंशी ही गोष्ट शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचं मुखपत्रातून टिका करण्यात आली आहे. (Saamana Editorial)

"केंद्रिय निवडणूक आयोगाने फक्त चार तासांच्या बैठकीत धक्कादायक निर्णय घेतला आणि शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवले. आयोगाने शिवसेना हे नावही स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई केली आहे. निवडणूक आयोगाच्याया निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा अंधेरी पोटनिवडणूकीसाठी आयोगाने केलेले हे मॅचफिक्सिंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटतआहेत," असे वृत्त सामनातून देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray
'धनुष्यबाण' गोठवल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे सूचक टि्वट, म्हणाले आमचे चिन्हं...

शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेतून आयोगाच्या निर्णयावर चीड व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेवर असे कितीही आघात केले तरी शिवसेना मागे हटणार नाही. शिवसैनिक जिद्दीने पेटून उठला आहे. याच जिद्दीच्या जोरावर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक जिंकणारच. असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, असेही सामनातून सांगितले आहे.

Uddhav Thackeray
शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर, गुन्हा दाखल : ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच, शिवसेना पक्षाचे नावदेखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com