Nilesh Lanke Vs Vikhe : ...जेव्हा नगरमध्ये खासदार विखे आणि आमदार लंके समोरासमोर येतात !

Ahmednagar Political News : ''...यापेक्षा जनतेची काम महत्त्वाची आहे !''
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये लंके विरुद्ध विखे असा राजकीय वाद पेटला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरु असून त्यामुळे नगरचं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणूक लंके विरुद्ध विखे अशी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे समोरासमोर आले. यावेळी लंके समर्थकांनी भावी खासदार म्हणून निलेश लंके यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं.

पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) हे एका आंदोलनाच्या निमित्ताने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्याचवेळी भाजपा खासदार सुजय विखे हेही एका बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी आमदार लंके यांच्या नावानं भावी खासदार म्हणून जोरदार घोषणाबाजी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil
Anna Hazare News : ...अखेर अण्णा हजारेंना मिळाला मतदानाचा अधिकार ! पारनेर सैनिक बँकेच्या निवडणुकीत मोठा टि्वस्ट

नगरमध्ये नेमकं काय घडलं..?

ठाकरे गटाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नगर शहरात अवैध पद्धतीनं मोकळ्या जागा बळकावण्यात येत असल्याच्या मुद्द्यांवरुन अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलेले होते. या मोर्चाच्या निमित्ताने तसेच इतर कामाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके तसेच राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. याचवेळेस एका बैठकीसाठी आणि आपल्या मतदारसंघातील कामांसाठी भाजप खासदार सुजय विखे(Sujay Vikhe Patil) हेही आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

मोर्चा पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना ठाकरे गटाचे विक्रम राठोड, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे आणि पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे जागा बळकवण्याच्या प्रकाराबद्दल असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला आणि त्यांना याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची कारवाई करण्याचे निवेदन दिले.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil
Ahmednagar News: गुंडांनी जागा बळकावल्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे

निवेदन देऊन बाहेर पडत असताना आमदार निलेश लंके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अचानकपणे जोरदार घोषणाबाजी करत लंके यांचा भावी खासदार म्हणून जयघोष सुरू केला आणि विविध प्रकारच्या घोषणा देत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. याचवेळेस भाजपा खासदार सुजय विखे हेही जिल्हाधिकारी कार्यालयातच उपस्थित होते. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने घोषणाबाजी करत विखेंसमोर आमदार लंके यांचं मोठे आव्हान असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

आमदार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या भावी खासदार म्हणून जोरदार घोषणाबाजी बोलताना सुजय विखे म्हणाले, कोण काय गोष्ट आहेत. यापेक्षा जनतेची काम महत्त्वाची आहे.

....अजून बराच वेळ आहे!

कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाबाबत आमदार लंके यांना विचारले असता ते म्हणाले, मी अशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ असल्याचंही लंके यांनी सांगितलं.

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil
Manipur Politics : 'राजीनामा देणार नाही, या कठीण काळात..' ; मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सर्व शक्यतांना फेटाळले..

लोकसभेला नगरमध्ये विखे विरुद्ध लंके लढतीची चर्चा...

गेल्या दोन वर्षापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी व्यूहरचना सुरू केलेली असून यासाठी विविध सामाजिक कामाच्या निमित्ताने अग्रेसर असलेले आमदार लंके यांना "कामाला लागा" अशा सूचना पक्ष पातळीवर दिल्या गेल्या असल्याचे बोलले जाते. यावरही लंके यांनी सध्या काही न बोलता यासाठी अजून बराच वेळ आहे असं सांगितलं.

एकूणच दक्षिण नगर(Ahmednagar) जिल्ह्यामध्ये आमदार लंके यांनी विविध विधानसभा मतदारसंघात आपला संपर्क या अगोदरच वाढवलेला असून विविध कार्यक्रमांसाठी त्यांची अनेक ठिकाणी उपस्थिती असते. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांच्यासमोर आमदार लंके यांचं तगडं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.