Ahmednagar News: गुंडांनी जागा बळकावल्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे

Ahmednagar नगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या जबरदस्तीने ताबा मिळवत असल्याचा प्रकार सुरु आहे.
Ahmednagar News:
Ahmednagar News: Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Politics : नगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या जबरदस्तीने ताबा मिळवत असल्याचा प्रकार सुरु आहे. या विरोधात शेकडो तक्रारी या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यात असेच प्रकार होत असल्याची माहिती तेथील लोकप्रतिनिधींकडेही आली होती. या गावगुंडांच्या टोळ्यांच्या विरोधात आज (30 जून) अहमदनगर येथे पीडित तक्रारदांरासह सर्व पक्षीय मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या गुंडांच्या टोळ्यांची ही दहशत रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

सर्वपक्षीय मोर्चा असल्याचे सांगण्यात आले असले तरी मोर्च्यात ठाकरे गटाचे विक्रम राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पारनेरचे आ.निलेश लंके, राहुरीचे आ.प्राजक्त तानपुरे यांच्याशिवाय इतर काँग्रेस, भाजप पक्षांचे नेते दिसून आले नाही. तरीही शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने आज (30 जून)आंदोलन करण्यात आले.

Ahmednagar News:
NCP- Nagpur Politics: शरद पवारांच्या सूचना अन् नागपूरसाठी राष्ट्रवादीचा नवा प्लॅन ठरला..!

शिवसेना ठाकरे गटाचे युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तक्रारदारांच्या तक्रारी मांडल्या. नगर शहर, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. यातून वृद्ध, असाहाय्य, निराधार, विदेशात असलेले, महानगरपालिकेचे थकबाकीदार अशा लोकांना, गावगुंड टोळ्यांकडून जबरदस्तीने त्यांच्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रकार सुरु आहे. (Ahmednagar Crime)

प्रशासनाच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून या लोकांच्या जागेवर गुंडांकडून ताबा मिळवला जात आहे. या तक्रारी महसूल प्रशासन, पोलीस ठाण्यातील प्रशासन यांच्याकडेही गेल्या आहेत. मात्र त्यात न्याय न मिळाल्याने आता या तक्रारी राजकीय पक्षांकडे येत आहेत. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके त्याचबरोबर राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही उपस्थिती लावत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे मोकळ्या जागांवर ताबा मिळवण्याच्या पद्धतीबद्दल अनेक तक्रारी केल्या. यावेळी अनेक पीडित कुटुंबीयांनी आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. (Political News)

Ahmednagar News:
Raju Patil's Video Viral: कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदेंच लढणार, फडणवीसांच्या विधानानंतर मनसे आमदाराचा 'तो' Video व्हायरल..

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी अशा पद्धतीने जागा बळकवण्याचे प्रकार होत असलेल्या प्रकरणांची सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले. यावेळी आ.निलेश लंके यांनी असे प्रकार केवळ नगर शहरात मध्येच नाही तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातून मोक्याच्या ठिकाणच्या असलेल्या जागा या करोडोच्या किमतीने विकल्या जात असल्या तरी मूळ मालकांना यामध्ये दहशतीखाली दमदाटी करत गप्प केले जात असल्याची तक्रार केली. प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.

आमदार लंके आणि आमदार तनपुरे यांनी एकूणच अशा घटनांची व्याप्ती पाहता लोकशाही दिनाप्रमाणे एखाद्या दिवशी तक्रारींसाठी जिल्हा प्रशासनाने तक्रारदारांना आवाहन करावे आणि त्यात त्यांच्या तक्रारींचा निपटारा करावा त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात एक पत्रपेटी ठेवून त्यामध्ये अशा तक्रारी दाखल करावे, यासाठी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. कारवाई झाली तर अशा प्रकारांना आळा बसेल असे सांगितले.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.