Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

`आव्हाड` प्रकरणाने सरकारची प्रतिष्ठा वाढली का?

छगन भुजबळ म्हणतात सध्याच्या सरकारकडे बहुमत आहे, मात्र लोकांचे प्रेम नाही

नाशिक : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jeetendra Awhad) यांच्याबाबत जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, हा अत्यंत गंभीर विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी व मुख्यमंत्र्यांची (Chief Minister) उपस्थिती असताना असं कोणी करेल का?. याचा तरी विचार व्हायला हवा. अशा प्रकारांनी राज्य सरकारची (Eknath Shinde Government) प्रतिष्ठा वाढली काय? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. (Chhagan Bhujbal criticise State Government`s roll in Awhad molestation Case)

Chhagan Bhujbal
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

श्री. भुजबळ आज नाशिकला दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. आव्हाड प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, गेले दोन तीन दिवस जे सुरु आहे, त्याने राज्य सरकारची प्रतिष्ठा वाढलीये का?. मार्केटमध्ये, लोकलमध्ये अनेक भगिनी असतात. तिथे देखील धक्का लागतो. मुख्यमंत्री समोर असतांना कुणी असे करेल का?. याचा विचार करणार की नाही. आपण असा गुन्हा दाखल करणार का?. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही समजदार आहेत, दोघांनाही हे समजायला हवे.

Chhagan Bhujbal
एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’ लढणार

भाजप आमदार काय करतात

ते म्हणाले, सिडको हे माझ्या घराशेजारीच आहे. अनेक वर्ष येथील विकास व विस्तार मी पाहिला आहे. येथे साठ हजार निवासी बांधकामे आणि तीन लाख नागरी वस्ती आहे. सिडको वासियांना विविध कामांसाठी सिडकोत जावे लागते. त्यांना काय तुम्ही मुंबईला पाठवणार काय. नाशिकचे सिडको कार्यालय औरंगाबादला हलविणार आहेत. हा निर्णय कसा होऊ शकतो, हा मला प्रश्न पडतो. कुणाच्या दबावामुळे हे कार्यालय हलविले जाते आहे. भाजपच्या आमदार काय करत आहेत. यामागे राजकारण आहे की अर्थकारण? असा प्रश्न त्यांनी केला.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक महतत्त्वाचे आहे. विमानसेवा बंद केली जात आहे. कार्यालये हलविली जात आहेत. हे काय सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करताहेत, असा सवाल त्यांनी केला.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय आहे. त्याबाबत ते म्हणाले आमदार सुहास कांदे हे निष्ठावंत व कार्यक्षम आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. तर पालकमंत्री दादा भुसे हे चांगले गृहस्थ आहेत. मुख्यमंत्री भेट देत नाहीत, त्यांच्याकडे वेळ नसतो. लोकांसाठी तसेच आमदारांसाठी त्यांनी स्वतंत्र वेळ द्यायला हवा. त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला हव्यात. सध्याच्या सरकारकडे बहुमत आहे, मात्र त्यांना लोकांचे प्रेम मिळताना दिसत नाही. मध्यावधी निवडणुका घेतल्या तर आम्ही तयार आहोत सर्वच तयार असतात.

संजय राऊत यांच्याविषयी...

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नुकताच जामीन मंजुर झाला. इडी खटल्यात सध्या तरी त्यांची सुटका झाली. त्यामुळे न्यायपालिका अजून शिल्लक आहे, याची जाणीव होते. त्यामुळेच हे शक्य झाले. या निकालाचे चांगले विश्लेषण व त्यात काही महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com