Congress: कोणती `महासत्ता` शिंदे गटाच्या मेळाव्याचे प्रायोजक आहे?

एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला उल्लेख महासत्ता त्यांचा दसरा मेळावा स्पॅान्सर करतेय का?
Dr. Hemlata Patil
Dr. Hemlata PatilSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यामागे महासत्ता आहे, (Super Power) असा उल्लेख गुवाहाटीला (Guwahati) केला होता. हीच महासत्ता त्यांचा दसरा मेळावा स्पॅान्सर करतेय का? मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेंची (Governmnt Machinery) एव्हढी लगबग का आहे? एव्हढा पैशाचा पूर, यंत्रणेचा वापर आणि बाळासाहेबांच्या पूत्राचा पराकोटीचा द्वेष आनंद दिघेंना (Anand Dighe) अपेक्षित होता का?, असा सवाल काँग्रेस (Congress) प्रवक्त्या डॅा. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) यांनी केला आहे. (CM Eknath Shinde`s rally of mumbai being criticise by Congress)

Dr. Hemlata Patil
Shivsena: `या` मुळे दसरा मेळाव्यात दिसणार नाशिकची ताकद!

उद्या (ता.५) मुंबईला मुख्यमंत्री शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईत होत आहे. त्यासंदर्भात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षां पासुन आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पहात आहोत. पुर्वी बाळासाहेबांनी नंतर उद्धवजींनी कॅांग्रेस, शरद पवार यांच्या वर टोका ची टीका केली म्हणुन सत्तेत असणाऱ्या या दोन्ही पक्षांनी हा मेळावा होऊच नये अशी लोकशाहीला मारक भुमीका कधीही घेतली नाही.

Dr. Hemlata Patil
Crime: १४ लाखांचा गांजा पिकवणाऱ्या वृध्दाची कारागृहात आत्महत्त्या

त्या काळी भाजप सोबत सत्तेत असणारे एकनाथ शिंदे या पक्षा सोबत सत्ता नको म्हणून भाजप आघाडी मधून बाहेर पडण्याची भाषा करीत होते तेंव्हा देखील कॅांग्रेसने त्यांच्या अंतर्गत प्रश्नामध्ये नाक खुपसले नव्हते.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या आडीच वर्षांपुर्वी भाजपने धोबी पछाड दिला म्हणून एक वेगळी आघाडी झाली. या समजून उमजून झालेल्या आधाडीमध्ये आम्ही आघाडी धर्म पाळला. पूला खालून बरेच पाणी गेले. गेल्या चार महिन्यांपासून राजकारणाचे एक बिभत्सरूप आपण सगळे पहात आहोत. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होऊच नये म्हणून शिंदेंच्या आडून भाजप ने जंग जंग पछाडले. न्यायालयाने चपराक दिल्या नंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते हसरा मेळावा, टोमणा मेळावा, सोनियांचे विचार असा पराकोटीचा विद्वेषजनक प्रचार करीत आहेत.

डॅा. शिंदेंचा मेळावा हा बिजेपी पुरस्कृत मेळावा असे आम्ही कुठे म्हटले नाही, पण त्यांच्या मेळाव्याची तयारी आणि माणसे गोळा करण्याचे टार्गेट तोंडात बोट घालायला लावणारेच आहे. शिंदे गट अनंत दिघेंचा वारसा सांगतो. अनंत दिघेंनी एका वर्षात गाडी घेतली म्हणून एका नगरसेवकाला ठोकताना आपण सिनेमात पाहीलं आहे.

शिंदे गटाची नाशिक जिल्ह्या मधील मेळाव्यासाठी गाड्यांची व्यवस्था करणाऱ्या मान्यवरांची यादी पाहीली. त्यात ते चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्या पैकी साधे कोणी नगरसेवक देखील नाही. त्यांना सरासरी एका तालुक्यातुन ५० बसेस व ४० ते ६० छोट्या गाड्या करण्याची जबाबदारी दिलेली आहे. भाजपच्या कृपेने वाढलेले इंधनाचे दर आणि खड्ड्यांचा भरावा लागणारा टोल यातून हे प्रामाणिक कार्यकर्ते कसा मार्ग काढतील हे कोडे माझ्या सारख्या गेल्या पस्तीस वर्ष राजकारणात असणाऱ्यांना सुटत नाही.

स्वतःची पदरमोड करून कोणी गाडया व बसेस करत असेल, अशा भंपक तत्वज्ञानावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मग शिंदे यांनी गुवाहाटीला उल्लेख केलेली महासत्ता ही हा मेळावा स्पॅान्सर करतेय का? मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेंची एवढी लगबग का आहे? कोणाला कसला धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला आपण वेठीला धरतोय?. एव्हढा पैशाचा पूर, यंत्रणेचा वापर आणि बाळासाहेबांच्या पूत्राचा पराकोटीचा द्वेष आनंत दिघेंना अपेक्षित होता का?. ते आज असते तर त्यांनी ही महासत्तेसोबत एक एकाला सोलून काढले असते. जास्त काय सांगावे लवकर ध्यानावर या, हा सुडाग्नी समोरच्याचे घर जाळताना आपल्या घराचे वासे ही उद्वस्थ करणार हे नक्की.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com