Congress News : कोण कोणाला गिळतंय? हे आम्ही काँग्रेसमध्ये अनुभवलंय...सपकाळांना गिळल्यावर ते लक्षात येईल : काँग्रेस सोडलेल्या बड्या नेत्याचे विधान

Ashok Chavan Statement : काँग्रेसला फोडण्याची आता गरजच राहिलेली नाही. कारण, काँग्रेचं नेतृत्व हे दिशाहीन झालं असल्यामुळे लोकांना भविष्य त्या ठिकाणी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडून अन्य पक्षात जात आहेत.
Harshvardhan Sakpal-Ashok Chavan
Harshvardhan Sakpal-Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Shirdi, 05 May : हर्षवर्धन सपकाळ हे नवीन नवीन आहेत, त्यांना अजून अनुभव यायचा आहे. आम्ही काँग्रेस पक्षात 50 वर्षे काम केलं आहे, त्यामुळे कोण कोणाला गिळतं? हे सर्व आम्ही काँग्रेसमध्ये अनुभवलं आहे. त्यांना अजून अनुभव यायचा आहे. ते नवीन अध्यक्ष आहेत. त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोणी कोणाला गिळलं ते, असा स्वानुभावच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sakpal) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर बोलताना भाजप ही काँग्रेसचे नेते गिळणारी चेटकीण आहे, असे विधान केले हेाते. त्यावर बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी मोठ्या खुमासदार शैलीत काँग्रेस पक्षातील काम करतानाचा स्वअनुभव कथन केला आहे. तसेच सपकाळ यांना गिळल्यानंतर लक्षात येईल कोणी कोणाला गिळलं ते, असं सूचक इशाराही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘आता काँग्रेस फोडा’ या आवाहनावर खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काँग्रेसला फोडण्याची आता गरजच राहिलेली नाही. कारण, काँग्रेचं नेतृत्व हे दिशाहीन झालं असल्यामुळे लोकांना भविष्य त्या ठिकाणी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडून अन्य पक्षात जात आहेत.

Harshvardhan Sakpal-Ashok Chavan
Maharashtra Politic's : सदाभाऊंचा राऊतांना गावरान दणका; अजितदादांना मुख्यमंत्री करणं म्हणजे ‘येरं माझ्या मागल्या अन्‌ ताक-कण्या चांगल्या...’

भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली पाहिजे, ही प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका योग्यच आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या अपयशामुळे लोकं आपोआपच त्यांना सोडून जात आहेत, तसेच लोक काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नाहीत, असा दावाहीमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Harshvardhan Sakpal-Ashok Chavan
Solapur News : माजी आमदार म्हेत्रेंसह गोकुळ शिंदेंना दणका; ‘मातोश्री’च्या थकीत कर्जापोटी युनियन बॅंकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई

ज्या पक्षांचा लोकांशी कनेक्ट आहे. तो पक्ष कधीही संपत नाही. मग तो स्थानिक असो, राष्ट्रीय असो अथवा प्रादेशिक असो. तामिळनाडूमध्ये डीएमके, एआयडीएमके आहेत. हे पक्ष प्रादेशिक पक्ष असले तरी त्यांचे अस्तित्व कायम आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार तेथील मतदारांचा कौन राहिलेला आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com