

NCP leader Dr. Satish Patil on BJP: शरद पवार यांच्याकडून मी स्वाभिमानाची शिकवण घेतली आहे. हा स्वाभिमानाचा ताईत मी गळ्यात घातला आहे. मलादेखील भाजपने मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यावर लाथ मारली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. (Youth will show all selfish leaders there right place in 2024 election)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अमळनेर (Jalgaon) येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 'साहेबांचा संदेश' या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी भाजपच्या (BJP) राजकीय धोरणावर टीका केली.
या वेळी माजी मंत्री डॉ. पाटील यांनी आपण स्वाभिमानाचा मंत्र शरद पवारांकडून शिकलो आहे. मलाही भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र, मी निष्ठेला कधी बगल दिली नाही. शरद पवार माझ्या गळ्यातील ताईत आहेत. त्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल, ते हात कापले जातील असा इशारा दिला.
या वेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विचार राज्याला अधोगतीकडे नेणारे असून, शेतकरी, कष्टकरी, मतदारांना विसरणाऱ्या स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत युवक हे काम निश्चितच करतील, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार पवार पुढे म्हणाले की, आपल्याला लढायचे आणि जिंकायचे आहे. संघर्षाची सुरुवात झाली आहे. तुमचा मंत्री हवेत गोळी मारणारा नेता आहे. तीन मंत्री असूनही दुष्काळाबाबत आढावा बैठक नाही. सध्याची राजकीय स्थिती पाहता, जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात परिवर्तनाची संधी आहे.
या वेळी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, शहराध्यक्ष शाम पाटील, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील, रविकांत वरपे, महेश तपासे, राजा राजापूरकर, कविता म्हेत्रे, पंकज बोराडे, उमेश पाटील, रिटा बाविस्कर, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.