Nana Patole on Pune Lok Sabha Result : 'पुण्यात कोणी बदमाशी केली मला माहिती आहे, आताच..' ; संतप्त पटोलेंचा कडक इशारा!

Nana Patole angry on Pune Congress Leaders : 'पुण्याची जागा आपण जिंकणार असल्याचा अहवाल मी राहुल गांधींना पाठवला होता, पण...' असंही नाना पटोलेंनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत म्हटले.
Nana Patole
Nana Patolesarkarama

Congress and Pune Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत देशात जरी पुन्हा एनडीए आघाडीला बहुमत मिळालेलं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा वरचढ ठरली आहे. राज्यात सर्वाधिक 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र पुण्यातील प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला.

या ठिकाणी भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना मोठ्या मताधिक्क्याने पराभूत केलं. त्यामुळे एकीकडे जरी राज्यात काँग्रेसला यश आलं असलं, तरी पुण्यातील प्रतिष्ठेच्या लढतीत पराभव पत्कारावा लागल्याने, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच नाराज झाल्याचे दिसत आहे. एवढच नाहीतर हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचेही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

'पुणे आणि अकोल्यातील पराभव माझ्या जिव्हारी लागलेला आहे. पुण्यात कोणी कोणी बदमाशी केली हे मला माहिती आहे. कार्यकर्त्यांप्रमाणे मलाही खूप संताप आलेला असला तरी मी बैठकीत संयमाने सर्वांचे ऐकून घेत आहे. शहरातील नेत्यांच्या मी पणामुळे, गटबाजीमुळे पुण्याची जागा आपण हाताने घालवली आहे.

विधानसभा, महापालिका निवडणुका मला जिंकायच्या आहेत, तुम्ही सुधारा अन्यथा पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.', अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी भर बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

Nana Patole
Pune Congress News : अरे, चाललंय काय पुण्यात; भाजपपाठोपाठ आता काँग्रेसचे कार्यकर्तेही भिडले !

पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांचा सुमारे सव्वालाख मताने पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले यांनी बूथनिहाय आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार धंगेकर, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, आबा बागूल आदी यावेळी उपस्थित होते.

नाना पटोले यांनी शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील बूथनिहाय आढावा घेतला. कोणत्या भागात भाजपला मताधिक्य मिळाले, त्याची कारणे काय आहेत असे संबंधित प्रभागाच्या प्रमुखास विचारण्यास सुरुवात केली.

कॅन्टोन्मेंट व कसबा मतदारसंघात ज्यांनी काँग्रेसचे काम केले नाही, अशा पदाधिकाऱ्यांकडूनही पटोले यांना माहिती देऊन आमच्या प्रभागातून मताधिक्य मिळाले असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीत आक्षेप घेत ‘ज्यांनी विरोधी पक्षाला मदत केली त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे.’’ असा आक्षेप घेतला.

Nana Patole
Nana Patole : लोकसभेला पुण्यात नेमकं काय झालं? नाना घेणार आढावा

कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्या भागात धंगेकरांना जास्त मते होते, तेथे यावेळी मताधिक्य का कमी झाले असा प्रश्‍न प्रभाग प्रमुखांना विचारला? एका माजी नगरसेवकाच्या स्वतःच्या बुथवर काँग्रेसला मताधिक्य मिळाले, पण शेजारच्या बूथवर ३०० मतांनी भाजपचा(BJP) नगरसेवक पुढे कसा जातो असाही प्रश्न‍ पटोले यांनी विचारला? त्याचे समाधानकारक उत्तरे पदाधिकाऱ्यांना देता आली नाही. त्यावर पटोले यांनी तुम्हाला प्रभागाचा प्रमुख केले, पक्षाचा नेता केला पण तुमचा प्रभाव १०-१५ बुथवर नाही का असा जाब विचारला. दरम्यान वेळेअभावी कोथरूड, पर्वती आणि वडगाव शेरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला नाही.

तुम्हाला जमत नसेल तर सांगा -

‘‘पुण्याची जागा आपण जिंकणार असल्याचा अहवाल मी राहुल गांधींना(Rahul Gandhi) पाठवला होता, पण तुमच्या बदमाशीमुळे ही जागा गेली. पुण्याची जागा हारल्याने माझे डोके गरम झालेले आहे. निवडणुकीपूर्वी तुम्हाला प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचे वाटप केले होते. कार्यकर्ते काम करत होते, पण पदाधिकाऱ्यांनी क्षमता असूनही काम केले नाही. तुम्हाला जमत नसेल तर सांगा अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत.’’ अशा शब्दांमध्ये मग पटोलेंनी पदाधिकाऱ्यांना एकप्रकारे दमच दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com