Eknath Shinde: शिंदेंच्या 'ठाण्या'वर भाजपचा डोळा; सेनेच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्री पदावरून घमासान

Political News : आता महत्त्वाच्या खात्यानंतर आता भाजप व शिवसेनेत ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून चढाओढ पाहवयास मिळत आहे.
Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवडही झाली. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खातेवाटप, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याचा फॉर्म्युला ठरला नसल्याने विस्ताराला उशीर लागत होता. आता फॉर्म्युला ठरला असल्याने रविवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता महत्त्वाच्या खात्यानंतर आता भाजप व शिवसेनेत ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून चढाओढ पाहवयास मिळत आहे. विकासनिधी आणि प्रकल्पांच्या दृष्टीने पालकमंत्रिपद महत्त्वाचे असल्याने या पदासाठी चुरस आहे. (Eknath Shinde News )

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर खातेवाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या खात्यांवरुन दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच चढाओढ दिसत आहे. यानंतर आता दोन्ही पक्ष ठाण्याच्या पालकमंत्रिपदासाठीही आग्रही आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातून शिवसेनेचे (Shivsena) सहा जण विजयी झाले. तर दुसरीकडे भाजपने नऊ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता याच 9 आमदारांच्या मदतीने भाजपने पालकमंत्रिपद मिळावे म्हणून रणनीती आखली आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Nana Patole: मोठी बातमी! विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का? पटोलेंचं थेट खर्गेंना पत्र

ठाण्याचा पालकमंत्री कायम शिवसेनेचा राहिला आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्यानं शिंदेंना ते पद स्वत:कडे ठेवता आले नाही. पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी पालकमंत्रिपद घ्यायलाचं हवे, असे शिवसनेच्या नेतेमंडळींची मागणी आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये वाद उफाळला, विधानसभा पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच; वडेट्टीवारांनी डागली तोफ

दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे अधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद भाजपला हवे आहे, त्यांच्या नेत्यांनी दावा केला आहे. ठाण्यातील भाजपचा स्ट्राईक रेट 100 टक्के आहे. सेनेचे 6, तर भाजपचे 9 आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद भाजपला मिळायला हवे. अशी मागणी जोर धरत आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Mahayuti Cabinet Expansion: तिढा सुटला अन् तारीखही ठरली? फडणवीस सरकारचा शपथविधी 'या' दिवशी होणार

शिंदे सरकार सत्तेवर असताना ठाण्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांच्याकडे होते. त्याआधी 2014 ते 2019 आणि 2019 ते 2022 या कालावधीत शिंदे यांच्याकडेच पालकमंत्रिपद होते. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देसाई यांच्याकडे सोपवली. आता शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी सेनेची मागणी आहे. त्यामुळे आता येत्या काळात पालकमंत्रिपद कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी आपल्या पहिल्याच भाषणाने संसद गाजवली! संविधानापासून अदानीपर्यंत सगळेच काढले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com