Congress leaders meet Uddhav Thackeray: उपराष्ट्र्पती पदाच्या निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग; काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Vice President election India News : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला होत असून दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत.
Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Uddhav Thackeray - Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपराष्ट्र्पती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला होत असून दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी दुपारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अमीन पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतेमंडळींनी मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये मतदानांसह राज्यातील घडामोडीवर चर्चा झाली. चार दिवसापूर्वीच राज्य सरकारने मराठा समजला महत्वाचे मानले जात असलेले हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. त्याविषयावर देखील यावेळी चर्चा झाली असल्याचे समजते.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
BJP Politics : 'मंडप' वही बना के दिखाया! भाजप आमदाराच्या गटाच्या हट्टापुढे प्रशासन हतबल; तगडा पोलीस बंदोबस्त

त्यासोबतच येत्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्वबळावर निवडणुका लढणार की एकत्रित निवडणूक लढणार यावर चर्चा झाली असल्याचे समजते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज व उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे बंधू एकत्र येणार का ? या विषयावर देखील चर्चा झाली असल्याचे समजते.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! सांगलीतील युवासेना नेत्यावर पोलिसांची थेट तडीपारची कारवाई; तीन जिल्ह्यात बॅनही

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat), अमीन पटेल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांच्यासोबत महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतेमंडळी मातोश्रीवर उपस्थित होते. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Manoj Jarange ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा 'अल्टीमेटम'; थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी

दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असल्याने तिकडे एनडीए आघाडीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सोमवारी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Manoj Jarange Patil : फुंकले तरी मनोज जरांगे पाटील हे उडून जातील : सोलापुरातील बैठकीत ओबीसी नेत्याचे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com