President's Police Medal: गडचिराेली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक'

President's Police Medal : गडचिराेली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदारांना 'पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले
President's Police Medal :
President's Police Medal :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Gadchiroli News: देशभरात पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी गडचिराेली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदारांना 'पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले आहे.

देशभरातील पोलीस सेवेत उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना एकूण 229 'पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले आहेत. त्यापैकी गडचिराेली पोलीस दलास तब्बल 33 'पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले असून गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

President's Police Medal :
CM Shinde On Thackeray: निवडणूक आल्यावर काहीजण मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याची आवई उठवतात; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

विशेष म्हणजे यावर्षीच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला 29 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे 'पोलीस शौर्य पदक' प्राप्त झाले होते. त्यानंतर आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 33 पोलीस अधिकारी व अंमलदारांना 'राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक' जाहीर झाले आहे. गडचिरोली पोलीस दलात या वर्षात एकूण 62 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त प्राप्त झाले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.