Gram Panchyat Election Results : शेवगावात अजित पवार गटाचे वर्चस्व,'मनसे'ने उघडले खाते

Shevgaon Political News : शेवगावमध्ये भाजपने सहा ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत.
NCP - MNS
NCP - MNS Sarkarnama

Shevgaon News : शेवगाव तालुक्यात झालेल्या 27 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात राष्ट्रवादीने 13 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. काही ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असले, तरी माजी आमदार चंद्रशेखर घुले (अजित पवार गट) यांच्या गटाने या निवडणुकांमध्ये बाजी मारली.

शेवगावमधील सामानगाव, बालमटाकळी, ढोरसडे/अंत्रे, या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. येथे भाजपची असलेली सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली. राष्ट्रवादीच्या ताब्यातील वडुले बुद्रुक, वरुर ग्रामपंचायतीवर भाजप(BJP)ने झेंडा फडकावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP - MNS
Gram Panchayat Election Results : नेते जरी पक्ष सोडून गेले, तरी पालघरचा गड मात्र कार्यकर्त्यांनी राखला!

खरडगावमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या जनशक्ती आघाडीने मुसंडी मारत राष्ट्रवादी(NCP)च्या गटाकडे असलेली ग्रामपंचायतीची सत्ता खेचून घेतली. बऱ्हानपूर व शेकटे येथे सदस्य पदासाठी समान मते पडली. त्यामुळे येथे ईश्वरी चिठ्ठीद्वारे अशोक कुंडलिक वाणी, गीता चव्हाण या विजयी झाल्या. काही ग्रामपंचायतीमध्ये गावपातळीवर राष्ट्रवादी व भाजप समर्थकांनी युती करून स्थानिक आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली होती. स्थानिक आघाडीने तब्बल चार ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत.

शेवगावमध्ये भाजपने सहा ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत. एरंडगावमध्ये ग्रामपंचायतीत सरपंच आणि सहा ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाचे निवडून आले आहे. हर्षदा काकडे यांच्या जनशक्ती मंचाच्या भगुरू आणि खरडगाव ग्रामपंचायतीत सत्ता आणली आहे. गोळेगाव ग्रामपंचायतीत मुक्ता अंधाळे (शरद पवार गट) यांनी सत्ता खेचून आणली आहे. (Gram Panchyat Election)

आव्हाने बुद्रुक : पांडू रामदास वाघमारे (सरपंच), संतराम कारभारी दिंडे, प्रियांका अमोल कवडे, विनायक सुधाकर कळमकर, अश्विनी गणेश खैरे, संगीता प्रताप कोळगे, जयश्री नवनाथ तागड, रुपाली संजय नांगरे, सुधाकर रामभाऊ चोथे, अजमुद्दिन रहिमान पठाण, स्वाती अनिल साळकर, आशा शिवाजी रसाळ

बऱ्हाणपुर : वैशाली सुभाष वाणी (सरपंच), नंदा सुनील खरात, विद्या ज्ञानेश्वर डोंगरे, अंकुश मोहन भालेराव, गीता शरद वाणी, विष्णू भगवान दिवटे, योगिता रोहिदास डोंगरे, अशोक कुंडलिक वाणी (ईश्वर चिठ्ठी)

NCP - MNS
Gram Panchyat Election Results : मंत्री विखेंनी ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत विजयांचं श्रेय दिले...

सामानगाव : आदिनाथ रामनाथ कापरे (सरपंच), आत्माराम संपत निकम, कृष्णा सुरेश सातपुते, विमल वसंत कांबळे, प्रमोद सुरेश कांबळे, लताबाई नंदू नजन, सुभद्रा बाबासाहेब काळे, सुदाम विनायक झाडे, संगीता रमेश नजन, शिला बाबासाहेब म्हस्के.

वडुले बुद्रुक : अलका भिमराज सागडे (सरपंच), गणेश नारायण बुचकुल, संगीता विष्णू शिंदे, सिंधू बाळासाहेब चोपडे, संजय अर्जुन पांडव, अजय मारुतराव डमाळे, सुनीता सुरेश केदार, जावेद बाबा शेख, मोनिका मंगेश पाखरे, हरदास विजयाबाई आप्पासाहेब.

भगुर : कोमल वैभव पुरनाळे (सरपंच), नागेश सुनील पुरनाळे, लताबाई दनियल गरुड , मनीषा नारायण जयभाये, सोमनाथ राजू साबळे, माया भाऊसाहेब गरुड, उद्धव शेषराव पुरूनले, अनिसा चांदभाई पठाण.

गोळेगाव : मुक्ता संजय आंधळे (सरपंच), संजय सोना पवार, भारत सूर्यभान आंधळे, सिमाबाई भुजंग आंधळे, नवनाथ लक्ष्मण रासनकर, लीलाबाई राधुबा बर्डे, मुक्ताबाई महादेव सानप, किसन नाथा आंधळे, मंजुश्री शरद फुंदे, प्रणिता शरद बर्डे

खडके : शिवानी नारायण पाखरे (सरपंच), रामदास अशोक शिंदे, आकांशा विठ्ठल पाखरे, शीतल कृष्णा पाखरे, सुखदेव हरिभाऊ पाखरे, पार्वती लक्ष्मण पाखरे, प्रवीण प्रभाकर कऱ्हे, मनीषा संजय गरुड

NCP - MNS
Gram Panchyat Election Results : नेवाशात ठाकरेंच्या शिलेदाराची बॅट तळपली, गडाखांचा सोळापैकी बारा ग्रामपंचायतींवर डंका

बालमटाकळी : राम भीमराव बामदळे (सरपंच), विक्रम सुधाकर बारवकर, आशा दिलीप भोंगळे, अरूणा सर्जेराव घोरपडे, कैलास आबासाहेब पौळ, विठ्ठल मोहन देशमुख , मेहमूददाबी युसुफ शेख, गणेश रायभान शिंदे, सोनाली शाम राजपुरे, रेखा सोमनाथ धोंगडे, संगीता दुर्योधन काळे, ज्ञानेश्वर नामदेव वैद्य, सुवर्णा महेश घरगणे, बिस्मिल्ला मकबूल शेख

ढोरसडे/अत्रे : ज्ञानदेव मुरलीधर निमसे (सरपंच), किसन भाऊसाहेब तुजारे, चंद्रकांत आप्पासाहेब ठोंबळ, शुभांगी दीपक कणके, कृष्णा बाळासाहेब गाढे, सोनाली किशोर वाघमारे, छाया पांडुरंग माळवदे, किशोर गोकुळ निकम, अश्विनी रामेश्वर खंबरे, सुरेखा रामकिसन तासतोडे

NCP - MNS
Gram Panchyat Election Results : येळी ग्रामपंचायतीवर काँग्रेस-शिवसेना आघाडी,तर अजित पवार गटाला चार जागा

एरंडगाव समसुद : प्रमिला संतोष धस (सरपंच), आप्पासाहेब दगडू कताडे, प्रियांका प्रकाश गजभिव, वैशाली मुकुंद धस, नंदुलाल लक्ष्मण गरोटे, अनिता मोजेस गजभिव, लता फ्रान्सिस गजभिव, प्रमोद विजय गजभिव, शंकर रंगनाथ कुरुंद, सविता किसन क्षीरसागर

रावतळे/ कुरुडगाव : जालिंदर बाळासाहेब काळे (पोटनिवडणूक)

(Edited By Deepak Kulkarni)

NCP - MNS
Gram Panchayat Election : वर्ध्यात भाजपचं कमळ उमललं; २७ पैकी २० ठिकाणी विजय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com