Nagpur Crime: आठ नवऱ्यांची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' अखेर पोलिसांच्या जाळ्यात! विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खतरनाक...

Nagpur Crime: विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठी खेळी करायची.
Samira Fatima_Looteri Dulhan
Samira Fatima_Looteri Dulhan
Published on
Updated on

Nagpur Crime: आठ नवऱ्यांची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठी खेळी करायची. नागपूर पोलिसांकडं यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी याला गांभीर्यानं घेऊन सापळा रचून अखेर संबंधीत 'लुटेरी दुल्हन'ला अटक केली. यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे.

Samira Fatima_Looteri Dulhan
Kolhapur Bench: मोठी बातमी! कोल्हापूरकर अन् पश्चिम महाराष्ट्राच्या लढ्याला अखेर यश; हायकोर्टाच्या सर्किट बेंचवर शिक्कामोर्तब

नेमकं प्रकरण काय?

समीरा फातिमा नामक महिला नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करत होती. लग्नाच्या एक महिन्यानंतर भांडण उकरुन काढत कथित पतीकडून पैसे उकळायला सुरुवात करायची, अशा प्रकारे तिनं आत्तापर्यंत आठ पुरुषांना फसवलं आहे, याबाबतची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

Samira Fatima_Looteri Dulhan
Devendra Fadnavis: "राजकारणात खरं माहिती असलं तरी बोलायचं नसतं कारण..."; गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर भाष्य करताना फडणवीसांचं मोठ विधान

उच्चशिक्षित अन् शिक्षिका म्हणून काम

समीरा फातिमा ही महिला उच्चशिक्षित असून शिक्षक म्हणूनही काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं त्यानंतर लग्न करायचं आणि शेवटी संबंधित पुरुषाला खोट्या गुन्हा अडकवण्याची धमकी देऊन लुटायचं अशी तिची फसवणुकीची पद्धत होती. कोर्ट केसेस दाखल करुन त्यातून सेटलमेंटद्वारे ती मोठी रक्कम अशा पुरुषांकडून उकळत होती. अशाच प्रकारे एका पुरुषाला या महिलेनं फसवलं या पुरुषाच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षापासून फरार असलेली ही 'लुटेरी दुल्हन' ऊर्फ समीरा फातिमा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Samira Fatima_Looteri Dulhan
Yavat Violence: यवतच्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवर गोपिचंद पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन-तीन महिन्यांपासून...

पोलिसांनी असं घेतलं ताब्यात

समीरा फातिमा ही नागपुरातील सिव्हिल लाइन्स इथं एका टपरीवर चहा पिण्यासाठी आली असता पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवून तिला अटक केली. या अटकेबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरिक्षक शारदा भोपाले यांनी सांगितलं की, फसवणूक झालेल्या या महिलेच्या एका पतीनं मार्च 2023 मध्ये समीराच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसात तक्रार दिली होती. या महिलेनं २०१० पासून अनेक विवाहित पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे.

लग्नानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची, नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची. तिने आतापर्यंत 8 लग्न केल्याचा आरोप तिच्यावर आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. नवीन लोकांशी बोलायची तेव्हा माझा घटस्फोट झालेला आहे अशी खोटी माहिती द्यायची. त्यानंतर मला तुमचा सहारा द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील असं म्हणत ती मुस्लिम पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर निकाह करायला लावायची आणि पैसे वसूल करायची. अशा प्रकारे तिनं आत्तापर्यंत 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com