ACB Trap News : गुरुवारी आमदार मिर्झांची चौकशी आणि शुक्रवारी शेजवळांवर ट्रॅप, योगायोग की आणखी काही ?

Shejwal : आरटीओ अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याने गीता शेजवळ चर्चेत आल्या होत्या.
Wajahat Mirza
Wajahat MirzaSarkarnama

Connection of two activities in Nagpur : कॉंग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे विधानपरिषदेचे सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांची गुरूवारी (ता. ४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (ता. ५) आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांच्यावर एसीबीने ट्रॅप केला. या दोन कारवायांचे कनेक्शन काय, असा प्रश्‍न आता पडला आहे. लागोपाठ या कारवाया होणे, हा निव्वळ योगायोग आहे, की आणखी काही, अशीही चर्चा आहे. (Is it just a coincidence, or something else)

वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याने गीता भास्कर शेजवळ चर्चेत आल्या होत्या. काल त्यांच्या विरोधात (ता. ५ मे) नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाकडून ४०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी गुरूवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आमदारांच्या नावे आरटीओकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात एसीबीने आमदार वजाहत मिर्झा यांची आठ तास कसून चौकशी केली.

या दोन्ही घटना लागोपाठ घडल्याने त्याचा संबंध एकमेकांशी जोडला जात आहे. वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आमदार मिर्झा हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करणार आहेत, असे होऊ द्यायचे नसेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत दिलीप वामनराव खोडे (वय ५० रा. वूड रोज हिरानंदानी मिडास,वसंत विहार, ठाणे) आणि शेखर भोयर यांनी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याला लाचेची मागणी केली.

२५ लाख रुपयांत हा सौदा पक्का झाला. याची तक्रार त्या अधिकाऱ्यांनी एसीबीकडे केली. दीड महिन्यांपूर्वी रविभवन परिसरात दिलीप खोडेला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर भोयरलाही अटक करण्यात आली. याच प्रकरणात गुरूवारी आमदार मिर्झांचीही चौकशी झाली.

Wajahat Mirza
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

आमदार मिर्झांची या प्रकरणात चौकशी झाल्याने त्यांनी चिडून जाऊन गीता शेजवळ यांच्यावर एसीबीची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले, अशी सूत्रांची माहिती आहे. याचा आधार काय, याची माहिती घेतली असता, आमदार मिर्झा यवतमाळ जिल्ह्यातले आहेत आणि कांद्री चेकपोस्टवर यवतमाळ एसीबीच्या पथकाने कारवाई केली, असे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन घटनांचा संबंध जोडला जात आहे.

अधिक माहिती घेतली असता, या प्रकरणाची तक्रार डीजी कार्यालयाकडे करण्यात आली होती. एसीबी डीजी कार्यालयावर कामाचा मोठा ताण सध्या आहे. कारण एसीबीच्या भरपूर कारवाया सद्यःस्थितीत सुरू आहेत. हे प्रकरण नागपुरातील (Nagpur) अधिकाऱ्याशी संबंधित असल्याने डीजी कार्यालयाने या तक्रारीवर कारवाई करण्याची जबाबदारी यवतमाळच्या (Yavatmal) टिमवर सोपवली. यामध्ये आमदार मिर्झांचा काहीही संबंध नाही. गुरूवारी आमदार मिर्झांची चौकशी आणि शुक्रवारी शेजवळांवर कारवाई हा निव्वळ योगायोग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Wajahat Mirza
Nagpur District APMC Analysis : सहकारात कॉंग्रेसचा दबदबा कायम, भाजपला आणखी एक संधी !

सुटला नाही ‘त्या’ घटनेचा गुंता..

काही दिवसांपूर्वी बजाज नगर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत एका आरटीओ अधिकाऱ्याच्या घरात त्याच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. ही घटनासूद्धा परिवहन विभागाच्या (RTO) दुसऱ्या मोटार वाहन निरीक्षकाशी संबंधित असल्याचे सूत्र सांगतात. या घटनेचाही गुंता अद्याप सुटलेला नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com