Maratha Vs OBC : लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही मराठा विरुद्ध ओबीसी मुद्दा तापणार; आमदारांची धडधड वाढली

Maharashtra Assembly Election 2024 : आता जो कोणी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल त्या आमदाराला पाडल्याशिवाय ओबीसी स्वस्थ बसणार नाही...
Maratha Vs OBC
Maratha Vs OBCSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार उपोषण करून सरकारवर दबाव टाकणाऱ्या जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी नेते आता सरसावरले आहेत. जो ओबीसीच्या विरोधात असले त्या आमदाराला आणि पक्षाला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बघता लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष बघायला मिळणार आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. लोकसभेत ठरवून उमेदवार पाडण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ओबीसी नेत्यांमार्फात आता ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून सरकाराला घेरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज प्रकाश अण्णा शेंडगे यांनी नागपूरमध्ये या संदर्भात बैठक घेतली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी विरोधकांना घरी बसवण्यात येणार असल्याचे आम्ही ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ओबीसींची बैठक घेऊन पुढील रणनीत ठरवण्यात येणार आहे. आजच्या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ (OBC) आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची भाषा आता बदलली असल्याने त्यांना बोलावण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सगे सोयरेचा शासनादेशामुळे ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या विरोधात आम्ही विभागावार बैठका घेत आहोत. आंदोलनाचा वनवा हा सर्वत्र भडकला आहे. आता जो कोणी ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल त्या आमदाराला पाडल्याशिवाय ओबीसी स्वस्थ बसणार नाही असेही ते म्हणाले.

Maratha Vs OBC
Rahul Gandhi Waynad Resign : मोठी बातमी! राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देणार; प्रियांका गांधींचंही ठरलं

सध्या जालना आणि पुणे येथे आंदोलन सुरू आहे. सरकारला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. काही ओबीसी नेते ही वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामउळे खरे कोण आणि खोटे कोण हे कळत नाही. जरांगेच्या आंदोलनामुळे ओबीसीची आरक्षणाची वाताहात होत आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही. दुसरीकडे मराठ्यांच्या मुलांसाठी कोट्यवधीचा निधी आणि वसतिगृह दिल्या जात आहे.

सरकारला जरांगे यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. 26 खासदार मराठा समाजाची निवडून आले आहे. असे असताना ते स्वतःला मागासले म्हणत आहे. हे कसे काय शक्य आहे. 80 टक्के मराठे ओबीसीत शिरले आहेत. उर्वरित 20 टक्के आम्ही घुसवू अशा पद्धतीची भाषा जरांगे करीत असले तर त्यास प्रत्‍युत्तर देणे आवश्यक असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

Maratha Vs OBC
Mahayuti Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी? शिंदेसेनेविरोधात अजित पवार गट 'अ‍ॅक्टिव्ह'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com