Pawar In Ambegaon : वळसे पाटलांच्या आंबेगावातून पवारांचा राष्ट्रवादी बंडखोरांबाबत कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

NCP News : ती संधी आल्यावर तुम्ही काय करायचं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मी निवडणुकीला उभं राहिलो. तुमच्या मतावर निवडून आलो आणि पॅनेलच्या विरोधात निवडून आलेल्या लोकांशी जवळीक केली, तर ती जनतेची फसवणूक असते. तशी फसवणूक दुर्दैवाने राज्यात काही ठिकाणी झाली आहे. त्यातून लोक संधी मिळेल तेव्हा योग्य तो निकाल घेतात. ती संधी वर्ष-दीड वर्षात येईल, ती संधी आल्यावर तुम्ही काय करायचं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता बंडखोरांबाबत एक संदेश दिला आहे. (Pawar Gave Message from walse patil's Ambegaon to activists about NCP rebels)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी (ता. १ ऑक्टोबर) जुन्नरच्या दौऱ्यावर होते. जुन्नरमधील आदिवासी विकास परिषदेनंतर पुण्याला येताना आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम आणि बाळासाहेब बाणखेले यांनी स्वागत केले. या वेळी पवारांसमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवार यांनी बंडखोरांबाबत कोणाचेही नाव न घेता योग्य तो संदेश दिला.

Sharad Pawar
Ajit Pawar To Atul Benke : अजितदादांनी डाव टाकला; पवारांनी गाडीत फिरवलेल्या बेनकेंवर आली नवी जबाबदारी...

पवार म्हणाले की, आंबेगाव तालुका, तुम्हा सगळ्यांचा आणि माझा एक प्रकारचा वेगळा संबंध आहे. अनेक वर्षे राजकारणात एखाद्यी गोष्ट तुम्ही सांगितली, तर त्याला मी कधीही नाही म्हटलं नाही. त्यामुळे माझा स्वतःचा दृष्टिकोन इथला कुठलाही प्रश्न असला तर त्याच्या मागं उभं राहायचं. लोकांचे प्रश्न सोडवायचे. या पद्धतीने आतापर्यंत पावलं टाकली आहेत.

राज्याच्या राजकारणात दुर्दैवाने काही बदल झाले. सत्ता येते आणि सत्ता जाते. पण, त्या सत्तेला चिटकून राहायचं नसतं. सत्तेला चिटकून राहायची भूमिका घेतल्यानंतर लोक कधी ना कधीतरी त्याचा कायमचा निकाल घेतल्याशिवाय राहत नसतात, असा इशाराही पवार यांनी संबंधितांना दिला.

Sharad Pawar
Sharad Pawar Junnar Tour : तटस्थ आमदार बेनकेंना पवार आपल्या गाडीतून कार्यक्रमाला घेऊन गेले

पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काही वेगळं राजकारण झालं आहे. माझा त्यातला आग्रह एकच आहे. मी कुठंतरी निवडणुकीला उभं राहिलो. तुमच्याकडून मतं घेतली. तुमच्या मतावर निवडून आलो आणि पॅनेलच्या विरोधात निवडून आलेल्या लोकांशी जवळीक केली तर ती भूमिका योग्य नसते. ती लोकांची फसवणूक असते. तशी फसवणूक दुर्दैवाने आपल्या राज्यात काही ठिकाणी झाली आहे. त्यातून लोक संधी मिळेल तेव्हा योग्य तो निकाल घेत असतात.

Sharad Pawar
Pankaja-Bawankule Visit : पंकजा मुंडेंनी भेटीसाठी आलेल्या बावनकुळेंना दीड तास ठेवले वेटिंगवर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com