Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी कुत्रा निशाणीवरही निवडून येतो...

मंगरुळपिर येथे २३ सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेच्या दरम्यान मंगरुळपिर येथे आले होते.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

मंगरुळपिर (जि. वाशीम) : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे मंगरुळपीरला २३ सप्टेंबर रोजी ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेदरम्यान आले होते. या यात्रेदरम्यान ते म्हणाले की मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो. त्यामुळे येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे.

मंगरुळपिर येथे २३ सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेच्या दरम्यान मंगरुळपिर येथे आले असता येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सभेच्या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना म्हटले की मी अगोदर काँग्रेसमध्ये (Congress) होतो. नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांमुळे शिवसेनेत (Shivsena) आलो, परंतु हिंदू विचारसरणीवाल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मी काँगेस सोडून शिवसेनेत आलो आणि ह्यांनी परत काँगेस सोबत हातमिळवणी केली. त्यामुळे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हा ४० जणांना घेऊन भाजप सोबत सरकार स्थापन केले.

तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला दोन मिनिटेसुद्धा भेटत नव्हते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजतासुद्धा भेटतात, माझ्या सिल्लोड मतदारसंघात सव्वातीन लाख हिंदू मतदार आहेत तर ५० हजार मुस्लिम मतदार आहेत आणि मी मुस्लिम असूनसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आलो आहे. मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो कारण की कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो असे सत्तार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.

Abdul Sattar
देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत तुम्हाला झापलं का? अब्दुल सत्तार म्हणाले...

परंतु त्यांच्या या वक्तव्याचा येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला असून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. कुत्रा निशाणीवरही निवडून येतो, या सत्तारांच्या वक्तव्याला अनेकांनी सकारात्मक घेतले, पण त्यांच्या विरोधी पक्षांनी मात्र त्यांना टारगेट करणे सुरू केले आहे. हे वक्तव्य भविष्यात सत्तारांना अडचणीत तर आणणार नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com