Vijay Wadettiwar : 'मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषिमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हाकला'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Manikrao Kokate Controversial Statement : नागपूर आणि अमरावती विभागाचा कृषि आढावा घेतल्यानंतर कोकाटे यांनी माध्यमांसमोर पीक विमा योजनेबाबत आपले मत मांडले. बोलण्याच्या ओघात भिकारीसुद्धा एक रुपया घेत नसल्याचे बोलून गेले. त्यामुळे ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
Vijay Wadettiwar-Manikrao Kokate
Vijay Wadettiwar-Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 14 February : भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे वादग्रस्त विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद ओढावून घेतला आहे. त्यामुळे त्यांना आता विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत असून काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

नागपूर आणि अमरावती विभागाचा कृषि आढावा घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kakate) यांनी माध्यमांसमोर पीक विमा योजनेबाबत आपले मत मांडले. त्यांनी या योजनेत अनेक घोटाळे झाले असल्याचेसुद्धा मान्य करून काही सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. सोबतच त्यांनी पीक विमा योजना बंद करणार नाही, असे जाहीर करताना बोलण्याच्या ओघात भिकारीसुद्धा एक रुपया घेत नसल्याचे बोलून गेले. त्यामुळे ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ‘आमच्या बळीराजाला महायुतीचे सरकार भिकारी म्हणतात’ अशी तोफ डागली. महायुतीचे सरकार हे बळीराजाचे नाही, यावर आज शिक्कामोर्तब झाले. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, शेतकऱ्यांची अवहेलना भिकारी म्हणून केली आहे.

Vijay Wadettiwar-Manikrao Kokate
Jarange On Munde-Dhas Meeting : मुंडेसोबतच्या भेटीनंतर मनोज जरांगे धसांवर तुटून पडले; म्हणाले, ‘गद्दारांच्या यादीत बसलात, मराठ्यांसोबत दगाफटका, आतून षडयंत्र...’

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, पीकविमा योजनेत भ्रष्टाचार करतात आणि आता थेट शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. यावरून महायुतीची नियत ही समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या असंवेदनशील मंत्र्याची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या हिवाळी अधिवेशनात एक रुपयात पीक विमा योजना चांगलीच गाजली होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीच या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घोटाळ्याचा भलामोठा संचही सादर केला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडाळाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी या मुद्यावरून माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

Vijay Wadettiwar-Manikrao Kokate
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंचं आता तुळजाभवानी मातेला साकडं!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मुंडे यांच्या विरोधात डीबीटी डावलून कृषी साहित्य खरेदी केल्याची याचिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. अंजली दमानिया यांनीसुद्धा या घोटाळ्यावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com