AIMIM Corporator Disqualified : चार अपत्ये, दोन लपवली; AIMIMच्या नगरसेवकाचे सदस्यत्वच रद्द!

AIMIM corporator Hussain Jangli Pappuwale was disqualified from Karanja Municipal Council after an inquiry found four children and discrepancies in his election affidavit : कारंजा नगर परिषदेत खळबळ; शपथपत्रातील माहितीची जिल्हा प्रशासनाकडून पडताळणी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचा अपात्रतेचा आदेश
Hussain Jangli Pappuwale
Hussain Jangli PappuwaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karanja Municipal Council : 'AIMIM'च्या नगरसेवक हुसैन जंगली पप्पूवाले (बंदूकवाले) यांना चारपैकी दोन अपत्ये लपवणे चांगलेच महागात पडले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या चौकशीत आणि पडताळणीत ते समोर आल्याने, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. या प्रशासकीय कारवाईमुळे कारंजा नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत 'AIMIM'चे हुसैन जंगली पप्पूवाले यांनी अपत्यांची माहिती लपवली असल्याची सुभान बुद्धू कामनवाले यांनी तक्रार केली होती. 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल तक्रारीत हुसैन जंगली पप्पूवाले यांची दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात अपत्यसंख्येबाबत चुकीची माहिती देण्यावरही तक्रारदाराचा आक्षेप होता.

या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल चौकशी सुरू केली. प्रशासनाने रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्मनोंदी, लसीकरण आणि शासकीय रुग्णालयातील प्रसुती नोंदींची पडताळणी केली. यात हुसैन जंगली पप्पूवाले यांना चार अपत्ये आढळली. जिल्हा प्रशासनाला पडताळणीत, कारंजा नगरपरिषदेच्या (Municipal Council) निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात हुसैन जंगली पप्पूवाले यांनी दाखवलेल्या अपत्य संख्येच्या माहितीशी विसंगतपणा आढळला.

Hussain Jangli Pappuwale
Shirdi police bribery case : वाळू वाहतुकीचा दरमहा 40 हजारांचा हप्ता! लाच घेताच हवालदाराची ACB पथकाशी रस्त्यावर झटापट; व्हिडीओ व्हायरल

सुभान बुद्धू कामनवाले यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने वाशिम जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 16 (1) (क) सह कलम 44 अन्वये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 23 नोव्हेंबर 2026 रोजी तक्रारदाराचा अर्ज मंजूर केला. त्यानुसार हुसैन जंगली पप्पूवाले यांचे नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देण्यात आला.

Hussain Jangli Pappuwale
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या संपत्तीच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक! CBI-ED तपासाचा आदेश रद्द; दिलासा तरी, टांगती तलवार कायम

या कारवाईचा आदेश जिल्हा प्रशासनाने 26 नोव्हेंबरला निर्गमित केला आहे. हुसैन जंगली पप्पूवाले हे 'AIMIM' पक्षाकडून निवडणूक लढले होते. प्रभाग क्रमांक चार (अ) मधून विजयी झाले होते. या प्रशासकीय कारवाईमुळे कारंजा नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतर नगरसेवकांनी देखील या कारवाईचा धसका घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.