Contractors Bill Pending: कंत्राटदारांची थकबाकी मिळणार, अजितदादांनी दिला शब्द; तब्बल साडेसात हजार कोटी...

Ajit Pawar Contractors : कोट्यवधीची बिले थकल्याने कंत्राटदार सरकारवर नाराज आहेत. एका युवा कंत्राटदाराने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी वर्ध्यात मोठी घोषणा केली.
Ajit Pawar Contractors
Ajit Pawar Contractors Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे राज्यभरातील कंत्राटदार आंदोलन करीत आहेत. यापुढे सरकारच्या योजनांचे कामे बंद करण्याचा इशाराही त्यांच्या संघटनांकडून देण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांना खूश करण्यासाठी कोट्यवधींच्या योजना आणि प्रकल्प जाहीर केले होते. कंत्राटदारांनी कामेही केली. मात्र त्यांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत.

एका युवा कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर शासकीय कंत्राटदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. वर्धा येथील एका कंत्राटदारानेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी याची दखल घेतली. ते म्हणाले, यापुढे एकाही कंत्राटदाराचे बिल पेंडिंग राहणार नाही. यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, कंत्राटदारांना आता चिंता करण्याची गरज नाही. सरकार यावर गंभीर आहे. सर्वांना दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता साडेसात हजार कोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी आत्महत्येचा विचार सोडून द्यावा. यापुढे आंदोलन करण्याचीसुद्धा कोणाला गरज भासणार नाही. यापुढे एकाही कंत्राटदाराचे बिल थकीत राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Ajit Pawar Contractors
Varaha Jayanti controversy : 'नितेश राणे योग्य बोलले त्यांनी वराहाचे अनुकरणही करावं', सुषमा अंधारेंचा टोला

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्यामुळे कोट्यवधींच्या निधीची जुळवाजुळव सरकारला करावी लागत आहे. मध्यंतरी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. महायुतीच्या मंत्र्यांमध्येच खटके उडाले होते. विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरले होते.

आदिवासी विभागाचा निधी वळवता येत नाही असे दाखले सरकारमार्फत दिल्या जात होते. अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातला औद्योगिक विकासात पर्यावरणाच्या अटींमुळे अडचणी येत असल्याची कबुली दिली. येथे कापूस पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. सेवाग्राम विकास आराखड्याला याच वर्षी मंजुरी देण्यात येईल. यासाठी स्थानिकांच्या सूचनांना विचार घेतला जाईल असेही आश्वासन अजित पवार यांनी दिले.

Ajit Pawar Contractors
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंनी व्ही. राधा यांची फाईल केली गायब; खळबळजनक आरोप करत दमानियांनी सरकारी पत्रच दाखवलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com