Varaha Jayanti controversy : 'नितेश राणे योग्य बोलले त्यांनी वराहाचे अनुकरणही करावं', सुषमा अंधारेंचा टोला

Sushma Andhare Nitesh Rane : वराह जयंती साजरी करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहिले आहे. त्यावरून सुषमा अंधारेंनी राणेंना टोला लगावला आहे.
Nitesh Rane, Sushma Andhare
Nitesh Rane, Sushma Andhare sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यभरात वराह जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 25 ऑगस्ट हा दिवस वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. वराह जयंतीबद्दल हिंदू समाजात विशेष आदर असून, हा उत्सव संपूर्ण राज्यात साजरा व्हावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून उलट सुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

वराह जयंतीवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, 'नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीने बोलले आहेत. राणे यांच्या वराह जयंती साजरी करण्याच्या भूमिकेचे स्वागत आपण केलं पाहिजे. माझी मागणी असेल की नितेश राणे यांनी या सगळ्या जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.तसेच एकदिवस वराह अवताराचं अनुकरण करत एक दिवस पूर्ण वराह अवतारातील वर्तन त्यांनी करावे. तसेच त्यांच्या अनुयायांनी वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा.'

'दहीहंडीला आपण कसे गोविंदा वगैरे होतो. तसंच वराह जयंती दिवशी नितेश राणे यांनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावे ही फार चांगली गोष्ट असेल मी त्यांचं अभिनंदन करील,' असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

Nitesh Rane, Sushma Andhare
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंनी व्ही. राधा यांची फाईल केली गायब; खळबळजनक आरोप करत दमानियांनी सरकारी पत्रच दाखवलं...

लाडकी बहीण योजना बाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सरकारची भूमिका अति घाई संकटात नेई अशी आहे. लाडकी बहीण योजना यांना डोईजड झाली आहे. लाडकी बहीण योजनेवरून घराघरात भांडण लावायचं काम सरकारने केल आहे.सरकारने याबाबत ढिसाळ नियोजन केलं म्हणून अनेक खात्यांना निधी देणे सरकारने बंद केल आहे. सरकारला निधी देणं शक्य होत नाही.

Nitesh Rane, Sushma Andhare
Jayant Patil praises Fadnavis : जयंत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक... भाजपमधील त्यांचा दराराही सांगितला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com