Ajit Pawar : "तुम्हाला निपटवून टाकू", अजितदादांच्या आमदारांची महिला मुख्याधिकाऱ्याला धमकी

Raju Kormore News : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एक कार्यक्रम तुमसर येथे पार पडला. त्या कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यानं सहकार्य केले नसल्यानं आमदारांनी थेट दमदाटी केली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांनी महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावलं आहे. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात महिला अधिकाऱ्याला कोरमोरे यांनी निपटून टाकू, असा दम भरला आहे. करिश्मा वैद्य, असं महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांची तुमसर येथे जनसन्मान यात्रा पार पडली. शुक्रवारी पाऊस झाल्यानं हेलिपॅडवर चिखल झाला होता. त्यावरून राजू कोरमोरे यांची थेट महिला अधिकाऱ्याला धमकवण्यापर्यंत मजल गेली. याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

आमदार कोरमोरे : तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवत आहात..

मुख्याधिकारी : विषय काय झाला?

आमदार कोरमोरे : तुम्ही पूर्ण आमच्या कामाचा सत्यानाश करत आहात. तुमच्या एकातरी कर्मचाऱ्यानं सहकार्य केलं का?

Ajit Pawar
BabanDada Shinde : मोठी घडामोड! बबनदादा शिंदेंनी तिसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' फुंकणार?

मुख्याधिकारी : दिवसभर कर्मचारी तिथे होते..

आमदार कोरमोरे : मी दिवसभर हेलिपॅड येथे होतो. एकही कर्मचारी तिथे नव्हता.

मुख्याधिकारी : रामटेके म्हणून कर्मचारी तिथे होते.

आमदार कोरमोरे : तुम्हाला खूप महागात पडेल. मी याचा बदला घेणार..

मुख्याधिकारी : बदला कशासाठी घेणार?

आमदार कोरमोरे : तुमच्याकडून जमत नव्हते, तर सांगायचं होतं. आमच्यात दम आणि ताकद आहे कार्यक्रम करून घेण्याची. तुम्ही विकारग्रस्त आहात. जास्त बकबक नको. तुम्हाला निपटवून दाखवतो. सहकार्य करायचं सोडून पूर्ण सत्यानाश करायचा.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? चिंचवडला चार दिवसांत दोन गटांची बंडाळी

"जनप्रतिनिधीचा अपमान, अधिकाऱ्याची मगरूरी..."

याबद्दल आमदार कोरमोरे यांनी तो आपलाच आवाज असल्याचं एका वृत्तपत्राला म्हटलं आहे. "आपण चुकीचे काही बोललो नाही किंवा शिवीगाळही केली नाही. केवळ कार्यक्रमादरम्यान झालेल्या कामचुकारपणाबद्दल विचारले. हा जनप्रतिनिधीचा अपमान असून मगरुरी आहे," असा आरोप आमदार कोरमोरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com