
Mumbai, 05 December : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत संपूर्ण पाठिंबा आहे. पण कोल्हापुरात तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांना नाराज करून जबरदस्तीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शक्तिपीठाबाबतचा पुढील निर्णय हा सर्वांशी चर्चा करूनच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी सविस्तरपणे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत संपूर्ण पाठिंबा आहे. अनेक शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की भूसंपादन करा.
सांगली जिल्ह्यातील काही भागात शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) समर्थन आहे. पण, कोल्हापूर जिल्हा जिथं सुरू होतो, त्या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आम्ही जेव्हा समद्धी महामार्ग तयार केला, त्या वेळी तो लोकांचा विरोध पत्करून केला नाही, तर लोकांना विश्वासात घेऊन समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मार्गी लावला, असा दावाही फडणवीस यांनी केला.
ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गही जनतेला, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मार्गी लावण्यात येईल. ज्या भागापर्यंत शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही, तिथंपर्यंतची अलायमेंट फायनल करायची. शक्तिपीठची पुढची अलायमेंट ही सर्वांशी चर्चा करून काही पर्यायी अलायमेंट काढता येते का, याचा विचार करण्यात येईल.
शेतकऱ्यांना नाराज करून, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आपली मानसिकता नाही, त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिटिंग जो महामार्गा आहे, त्याला कोल्हापूरच्या आधी कोठे जोडता येईल का? तसेच, उड्डाणपुलाच्या माध्यमातून निर्णय करता येईल का, अशा चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. पण, सांगली जिल्हापर्यंत शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे चित्र पालटून गेले आहे. महाराष्ट्राचे न्यू इंडस्ट्री मॅग्नेटचा विस्तार आता पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला होताना दिसत आहे. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी मी आग्रही आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबतचा पुढचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून घेण्यात येईल. तोपर्यंत तो निर्णय होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.