Prakash Ambedkar News : अकोला लोकसभेबाबत मोठी अपडेट; आंबेडकरांना मिळालं 'हे' चिन्ह

Akola Loksabha Constituency : 2019 च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात 'कपबशी' चिन्ह, तर अकोल्यात गॅस सिलिंडर चिन्ह मिळालं. तर अकोल्यातूनच 2014 च्या निवडणुकीत कपबशी...
Prakash Ambedkar and VBA
Prakash Ambedkar and VBASarkarnama
Published on
Updated on

Akola Loksabha Constituency इंडिया आणि महाविकास आघाडीतील प्रवेशाचं स्वप्नं धुळीस मिळाल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार महाराष्ट्रात जाहीर केले आहेत. यात काही ठिकाणी त्यांनी शरद पवार गटासह काँग्रेसलाही पाठिंबा दिला आहे. वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर हे स्वत:ही अकोल्यामधून निवडणुकीच्या समोर येत आहेत. अकोल्यातून चिन्ह वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Prakash Ambedkar - Mahadeo Jankar News)

प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर यांना कोणतं चिन्हं मिळतं याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महादेव जानकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली आहेत. अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांना 'प्रेशर कुकर' चिन्ह मिळाले आहे.

Prakash Ambedkar and VBA
Loksabha Election 2024 : उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदे लढणार, 15 एप्रिलला शक्तिप्रदर्शनासह अर्ज भरणार

त्यामुळे आंबेडकर हे 'प्रेशर कुकर' चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. वंचितकडून 'गॅस सिलिंडर' पहिली पसंती, तर तिसऱ्या पसंतीला पर्याय हा 'रोड रोलर' चिन्हाची मागणी होती. परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना ‘शिट्टी’ चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. 

परंतु, आता वंचितला दुसऱ्या पसंतीचं 'प्रेशर कुकर' चिन्ह भेटलं आहे. या चिन्हावर आता आंबेडकर प्रचाराला समोरे जाणार आहेत. दरम्यान, अकोल्यात आता तिरंगी लढत होणार असून, यामध्ये काँग्रेसकडून अभय पाटील, भाजपचे(BJP) अनुप धोत्रे आणि वंचितचे उमेदवार स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात असणार आहेत.

राज्यात वंचित विरोधात भाजप अशीच लढत होत आहे. काँग्रेस, एनसीपी हे रेसमध्ये नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत महाराष्ट्रात त्याचा फटका इतरांना बसण्याची चिन्हं आहेत, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मागील 2019 च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात 'कपबशी' चिन्ह, तर अकोल्यात गॅस सिलिंडर चिन्ह मिळालं. तर अकोल्यातूनचं 2014 च्या निवडणुकीत कपबशी, 2009 मध्ये पतंग चिन्हावर आंबेडकर निवडणूक लढले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून ते 'फ्रेशर कुकर' चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

आता भाजपचे बंडखोर नारायण गव्हाणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, काँग्रेसचे अभय पाटील (Abhay Patil) यांच्या उमेदवारीनं यंदा भाजपच्या मताधिक्यात फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघाकड़ं राज्यासह देशभराचं लक्ष असणार आहे.

Prakash Ambedkar and VBA
Parbhani Lok Sabha Election 2024: जानकरांची 'शिट्टी' वाजणार का?; परभणीत पहिल्यांदाच शिट्टी विरुद्ध मशाल

दिवसेंदिवस अकोला लोकसभा निवडणूक अतिशय रंजक होतानाचे चित्र आहे. दरम्यान, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. घोडा मैदान जवळ आहे. मतदारांचा कौल कोणाकडं असणार? कोण बाजी मारणार? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

'मागील 2019 चा'अकोला लोकसभेचा निकाल :

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

--संजय धोत्रे : भाजप : 5,54,444

--प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 2,78,848

--हिदायत पटेल : काँग्रेस : 2,54,370

R

Prakash Ambedkar and VBA
BJP-MNS Alliance: गुढीपाडवा मेळाव्याआधीच फडणवीसांनी मनसेबाबत टाकला मोठा बॉम्ब; म्हणाले, 'महायुतीत मनसे...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com