Akot Gambling Raid : भाजप पदाधिकाऱ्याच्या जुगार अड्ड्यावर छापा : मुख्य आरोपी आमदाराचा निकटवर्तीय असल्याचा आरोप

Akot Gambling Raid : पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण आठ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Akot Gambling Raid | 22 Gamblers Arrested | Police Action
Police conduct a raid on an illegal gambling club in Chauhatta village under Dahi Handha police station limits in Akola district. The operation led to the arrest of 22 gamblers and seizure of property worth ₹8.67 lakh.
Published on: 
Updated on: 

Akot News, 14 Nov : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहट्टा येथे सुरू असलेल्या जुगार क्लबवर अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत २२ जुगाऱ्यांसह क्लबच्या मुख्य संचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी आठ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांचे जाळे पुन्हा चर्चेत आले आहे.

चौहट्टाबाजार येथील सार्वजनिक विद्यालयासमोर हा जुगार क्लब सुरू असल्याची माहिती आहे. सध्या पदावर असलेल्या एका आमदाराच्या निकटवर्तीय व्यक्तीने हा क्लब सुरू केल्याची परिसरात चर्चा होती. या क्लबमध्ये अकोला जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमधूनही मोठ्या संख्येने जुगारी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

दरम्यान, अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या जुगार क्लबबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह छाप्याचे नियोजन केले. त्यानुसार पथकाने अचानक क्लबवर धाड टाकली. पोलिसांची कारवाई सुरू होताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईत २२ जुगाऱ्यांना पकडण्यात आले. तसेच क्लबचा मुख्य संचालकही पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल असा एकूण आठ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Akot Gambling Raid | 22 Gamblers Arrested | Police Action
आता विलिनीकरणाच्या चर्चांचा कंटाळा आलाय...", सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

विशेष म्हणजे, एका विद्यमान आमदाराच्या निकटवर्तीय असलेल्या दादाराव पेठे या भाजप पदाधिकाऱ्याचा हा क्लब असल्याने या कारवाईला राजकीय वर्तुळातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, संबंधित राजकीय व्यक्तीचा या जुगार क्लबशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Akot Gambling Raid | 22 Gamblers Arrested | Police Action
Chandrakant Patil : सतेज पाटलांचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा प्लॅन ठरला; मार्चमध्ये 'तो' कायदा आणणार!

दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध जुगार व्यवसायावर झालेल्या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असताना त्याची माहिती स्थानिक पोलिसांना आधीपासून होती का, तसेच या व्यवसायामागे आणखी कोणाचे पाठबळ आहे, याचा तपास होणे अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.