Unseasonal Rain : पाऊस, गारपिटीनंतर विदर्भातील नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

Major Damage : सुधीर मुनगंटीवार, प्रतापराव जाधव, यशोमती ठाकूर, रणधीर सावरकर सरसावले
MP Prataprao Jadhav at Buldhana.
MP Prataprao Jadhav at Buldhana.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तडाखा दिलाय. रविवारी (ता. 26) रात्रीपासून झालेल्या या पावसानंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. नुकसानग्रस्त भागातील अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढं सरसावले आहेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बुलढाण्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, तिवसाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर, अकोला पश्चिमचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांचा यात समावेश आहे. (All Party Leaders Including Sudhir Mungantiwar, Prataprao Jadhav, Yashomati Thakur, Randhir Sawarkar Of Vidarbha Step Ahead For Farmers After Unseasonal Rain, Hailstorm)

MP Prataprao Jadhav at Buldhana.
Nagpur Devendra Fadnavis : अवकाळी पावसाच्या नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश

मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांना साद

अवकाळी पावसामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालय. यासंदर्भात तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आग्रह राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलय.

पावसामुळं झालेल्या जिल्ह्यातील नुकसानाची माहिती तातडीनं मुनगंटीवार यांनी घेतली. पालकमंत्री या नात्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे त्वरीत आदेश दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूल मंत्र्यांना तात्काळ पत्र देत अवकाळी पावसामुळं चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावे, असा आग्रह देखील त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेनकोट घालत प्रतापराव बांधावर

ऐन हिवाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुक्यांना वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. सिंदखेडराजा, देऊळगावराजा व लोणार आदी तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पाऊस सुरू असल्याने खासदार जाधव रेनकोट घालुन बांधावर पोहोचले.

रविवारी रात्रभर बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह वादळी वारा, गारांचा वर्षाव आणि तुफान पाऊस झाला. सर्व 13 तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली. पिकांची अतोनात नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला. सोमवारी (ता. 27) खासदार जाधव यांनी सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्याला भेट दिली. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही जाधव यांनी प्रशासनाला दिल्या. सिंदखेडराजा तालुक्यात 84.3 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. त्याखालोखाल देऊळगावराजा तालुक्यात 82.4 मिलिमीटर, मेहकर तालुक्याला 70 मिलिमीटर, लोणार तालुक्यात 65 मिलिमीटर पाऊस झालाय.

MP Prataprao Jadhav at Buldhana.
Buldhana Ravikant Tupkar : पोटात अन्न नसलेल्या तुपकरांची पोलिसांना वाटतेय भीती

अमरावतीलाही तडाखा

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापूस, तूर, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालय. वेचणीला आलेला कापूस भीजलाय. पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलीय. वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भीजल्यानं त्याची प्रतवारी खराब झालीय. या कापसाला बाजारात योग्य भाव मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं सरकारनं तातडीने पंचनामे करीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली.

गेल्या हंगामात सरकारनं पंचनाम्यांमध्ये हलगर्जीपणा केला होता. त्यामुळं शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही. त्यामुळं आता तरी सरकानं पाऊस व गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे योग्य ते पंचनामे करण्याबाबत गांभीर्य दाखवावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

MP Prataprao Jadhav at Buldhana.
Amravati Politics : दुखापतीनंतर खासदार बोंडेंनी घेतलं काँग्रेसला फैलावर

अकोल्यात मोठं नुकसान

रविवारी रात्री झालेल्या पावसामुळं अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता. सोमवारी दिवसभ जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू होतं. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत अकोला पश्चिमचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी महसूल मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व 52 मंडळामध्ये पंचनामा करून नुकसान भरपाईचे आदेश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Edited by : Prasannaa Jakate

MP Prataprao Jadhav at Buldhana.
Akola Police : अवैध धंद्यांवरुन एकाच वेळी सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदारांचा ‘लेटरबॉम्ब’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com