Ayan Ahmed Case : अयान अहमदचे घर पाडा, 'बुलडोझर' लावा; भाजपच्या आक्रमकतेमुळे खळबळ

BJP intensifies demand for strict action, seeks demolition of main accused Ayan Ahmed house in Paratwada sexual exploitation case : अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणावरून, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक असून, मुख्य आरोपी अयान अहमद याचे घर पाडण्याची मागणी लावून धरली आहे.
Ayan Ahmed Case
Ayan Ahmed CaseSarkarnama
Published on
Updated on

Amaravati Paratwada case : अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अयान अहमदच्या कृत्यावर हिंदुत्वावादी संघटना आक्रमक आहेत.

अयान अहमदच्या घरावर कारवाई करा, पाडा, बुलडोझर लावा, अशी मागणी करत आहेत. भाजपचे ठाकुर प्रमोद सिंह गडरेल यांनी ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे परतवाडा परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे.

परतवाडा लैंगिक अत्याचारात आठ पीडिता समोर आल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ अन् फोटो समोर आले आहेत. व्हिडिओ अन् फोटो व्हायरल झाल्यानंतर शोषणाचा हा प्रकार समोर आला. भाजपचे (BJP) खासदार अनिल बोंडे याप्रकरणात सुरवातीला आक्रमक होते. पोलिस महानिरीक्षक राकेश ओला आणि पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली.

भाजपबरोबर काँग्रेस अन् हिंदु्त्ववादी (Hindutva) संघटना या प्रकरणात आक्रमक झाल्या. अचलपूर नगरपालिकेने अयान अहमदच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावत, अतिक्रमणांवर थेट बुलडोझर लावला. पीडिता अल्पवयीन असल्याने परतवाडा इथं तणावाचे वातावरण होते. अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी आढावा घेत, पीडिता या सर्व मुस्लिम समाजाच्या आहेत, असा मोठा खुलासा केला.

Ayan Ahmed Case
Paratwada boycott accused : परतवाडा लैगिंक शोषण प्रकरण पेटलं! अयान अहमदसह कुटुंबावर बहिष्कार, मुस्लिम समाज आक्रमक

मुस्लिम समाजाने अयान अहमद याच्याविरोधात आक्रमक होत, बहिष्काराची भाषा बोलली. या प्रकरणात SIT तपास करत असताना, धक्कादायक माहिती येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयात काल आढावा बैठक घेत, परतवाडा प्रकरणात वेगानं तपास करण्याच्या सूचना केल्या.

Ayan Ahmed Case
Paratwada Viral Video: अमरावती लैगिंक शोषण घटनेचे पडसाद; बाजारपेठ बंद, 'AIMIM'चा खुलासा, तर आरोपीच्या घराला 'बुलडोझर' लावण्याची तयारी?

दरम्यान, आता मुख्य संशयित आरोपी अयान अहमदच्या कृत्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणाचा संताप इतका अनावर झाला आहे की, अयानच्या घरात भाड्याने असलेल्या दुकानदारांनी बाहेर पडण्यास सुरवात केली आहे.

इमारतीतील दुकानं बंद

अयान अहमद याचे कारनामे उघड झाल्यानंतर अचलपूरच्या परतवाडा शहरात तीव्र संताप आहे. अयानचे ज्या इमारतीत हे काळे धंदे चालायचे त्या इमारतीत गाळे भाड्याने घेत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी आता तेथून काढता पाय घेतला आहे. दुकानदारांनी माल साहित्य, काउंटर, फर्निचर बाहेर काढून घेतले आहे.

घर जमीनदोस्त करण्याची मागणी

याप्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वळण घेतले आहे. अयान अहमदने केलेल्या कृत्यामुळे काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. अयान अहमदचे घर तत्काळ जमीनदोस्त करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ठाकूर प्रमोदसिंग गडरेल यांनी केली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, परतवाडा परिसरात पोलिस बंदोबस्त कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com