Ambadas Danve : राजन साळवी सोडून गेल्याने फरक पडत नाही, अंबादास दानवेंचा टोला

Ambadas Danve Criticized Rajan Salvi : कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र आता हा किल्ला उद्ध्वस्त होऊ लागला आहे. कोकणातील राणे, उदय सामंत यांच्यासारखे नेत्यांनी आधीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.
Ambadas Danve Criticized Rajan Salvi
Ambadas Danve Rajan Salvi sarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेूब ठाकरे पक्षातील नेते पक्षांतर करत आहे. यात आता कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांचीही भर पडली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांचे पक्षांतर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झटका मानला जात असताना पक्षातील नेते मात्र साळवी यांच्या जाण्याने फरक पडणार नसल्याचे म्हणत आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून जायला नको होते. निवडणूक हार-जित होतच असते. पराभवामुळे पक्ष सोडणे हे सर्वात चुकीचे आहे.

Ambadas Danve Criticized Rajan Salvi
Suresh Dhas : मुंडेंविरोधात रान उठवणाऱ्या धसांना अजितदादांनी टाळले? भेटही नाकारली

कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र आता हा किल्ला उद्ध्वस्त होऊ लागला आहे. कोकणातील राणे, उदय सामंत यांच्यासारखे नेत्यांनी आधीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदार सोडून जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात जुनेजाणते राजन साळवी हेसुद्धा पक्ष सोडून गेले आहे. ही ऑपरेशन टायगरची सुरुवात मानली जात आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपला एकत्रित विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी टिकली पाहिजे असेही मत व्यक्त केले.

मदरशांची तपासणी करण्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून दानवे यांनी राणेंना फटकारले. देशात राज्यात तुमचे सरकार आहे. देश विरोधी कारवाया कोणी केल्या? या सगळ्या प्रकरणांची चौकशी आम्हाला करण्याचा अधिकार आहे का? केंद्र व राज्यात तुमचे सरकार आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे, असा शब्दांत दानवेंची नितेश राणे यांचीही कान उघडणी केली.

Ambadas Danve Criticized Rajan Salvi
Mahadev Munde latest Update : महादेव मुंडे खून प्रकरणातील गुन्हेगारांच्या तपाससाठी SP नवनीत काँवत यांचा मोठा निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com