Amravati Graduate Result : अमरावतीमध्ये मोठा उलटफेर होणार? धिरज लिंगाडे आघाडीवर!

Amravati Graduate Result : दोघांच्या मतातील फरक ५३२ एवढा आहे. अतितटीची लढत होणार!
Amravati Graduate Result : Dheeraj Lingade
Amravati Graduate Result : Dheeraj Lingade Sarkarnama
Published on
Updated on

Deeraj Lingade : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आता मतमोजणी पार पडत आहे. कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने पुन्हा डॉ. रणजित पाटील (Ranjeet Patil) यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये अतितटीची लढत होताना दिसत आहे.

Amravati Graduate Result : Dheeraj Lingade
MVA News: सुधाकर अडबाले विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपसाठी धोक्याची घंटा?

अमरावती (Amravti) विभाग पदवीधर मतमोजणी होत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार,पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर आहेत. तीन वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता.

आतापर्यंत 1 ते 14 टेबलवरची मतमोजणी पार पडली आहे. भाजपचे रणजित पाटील यांना 11312 मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांना 11992 मते आहेत. दोघांच्या मतातील फरक 680 एवढा आहे. मतांच्या फरकावरून दोघांमध्ये अतितटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Amravati Graduate Result : Dheeraj Lingade
Teacher-Graduate Eletion Results : उद्या शिक्षक-पदवीधर निवडणुकांमध्ये कुणाचा 'निकाल' लागणार?

य़ापूर्वी सकाळी अमरावती पदवीधर मतदारसंघाची पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून, यात 192 मते वैध ठरली आहेत. 73 मते अवैध ठरली आहेत. सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील 34 मते अवैध ठरली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com