Nitin Gadkari Win In Nagpur : नितीन गडकरी नाम ही काफी है..! ठाकरेंचा 'करेक्ट कार्यक्रम' अन् विजयाची हॅटट्रिक

Nagpur Loksabha Election 2024 Result : भाजप नेते नितीन गडकरी यांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४० हजार मतांची आघाडी घेतली असल्याने त्यांची विजयाची हॅटट्रिक जवळवास निश्चित झाली आहे.
Nitin Gadkari Vs Vikas Thackeray
Nitin Gadkari Vs Vikas Thackeray Sarkarnama

Nagpur Lok Sabha Election Result 2024 Live Update : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली असून त्यांनी प्रतिस्पर्धी महविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना मात दिली आहे.

आता फक्त त्यांच्या विजयाचीच घोषणा बाकी असून केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाल्यास गडकरी यांना त्यांचे आवडीचे रस्ते व परिवहन खाते देतात की नवे खाते देऊन प्रमोशन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीन गडकरी यांनी तब्बल 88 हजार मतांची

भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४० हजार मतांची आघाडी घेतली असल्याने त्यांची विजयाची हॅटट्रिक जवळवास निश्चित झाली आहे. सध्या नऊ फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार १२ फेऱ्यांचे मतमोजणी आटोपली आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी यापूर्वी सलग दोनवेळा निवडून आले आहेत. माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी यापूर्वी पराभूत केले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांचे मताधिक्य तीन लाखांच्या आसापास होते. यावेळी त्यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांचे टार्गेट ठेवले होते.

काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांना त्यांच्या विरोधात यावेळी मैदानात उतरवले. विलास मुत्तेमवार यांचे ठाकरे हे शिष्य आहे.

गुरुच्या पराभवाचा बदला ठाकरे घेतली अशी जोरदार हवा काँग्रेसने निर्माण केली होती. महाविकास आघाडीची एकजूट याशिवाय मतविभाजन करणारे उमेदवार रिंगणात नसल्याने भाजपच्या गोटातही धाकधूक वाढली होती.

Nitin Gadkari Vs Vikas Thackeray
Nashik Lok Sabha Result 2024 : हेमंत गोडसेंना 'धोका', सीएमच्या दीड डझन बॅगाही झाल्या फेल!

यातही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीने न मागताच काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे नागपूरमध्ये चुरशीचा मुकाबला रंगल्याचे दिसत येते. स्वतःविकास ठाकरे यांनी एक लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण येणार असल्याचा दावा केला होता.

मात्र, मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच विकास ठाकरे माघारत चालल्याने दिसून येते. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये गडकरी यांनी 40 हजारांची आघाडी घेतली आहे. एवढी मोठी आघाडी भरून काढणे अवघड असते.

आजवर झालेल्या निवडणुकांचा इतिहासुद्धा हेच सांगतो. हे सर्व बघता नितीन गडकरी यांचे हॅटट्रिक जवळपास निश्चित झाली आहे. विकास ठाकरे यांना उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतफेट्या उघडल्यावरच चमत्काराची आशा करावी लागणार आहे.

Nitin Gadkari Vs Vikas Thackeray
Shivsena Analysis: राज्यात ठाकरेंचा डंका..पण विश्वासू तीन साथीदारांना बसला दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com