Amravati Teacher Election: अमरावती शिक्षक मतदारसंघ: विजयासाठी १६ हजार १३४ मतांची कोटा; एकनाथ शिंदेंचा उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर

Teacher MLC Election: विदर्भातील अमरावती या मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात एकूण ३३ हजार ३४ मतांची मोजणी तीन फेऱ्यात करण्यात आली. यातील ७६८ मते अवैध ठरली असून ३२ हजार २६६ मते वैध ठरली आहेत. विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

kiran saranik, shrikant deshpande
kiran saranik, shrikant deshpandesarkarnama
Published on: 
Updated on: 

अमरावती, ता.२७ : अमरावती शिक्षक मतदारसंघात विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा कोण पूर्ण करतो यावर विजयाचे समीकरण अवलंबले आहे. पहिल्या पसंतीच्या तीन फेरी अखेर सेनेच्या किरण सरनाईक यांनी सर्वाधिक ८ हजार १६२ मते मिळाली असली तरी विजयासाठी त्यांना दुसऱ्या पसंतीची ७ हजार ९७२ मते मिळवावी लागणार आहे.

विदर्भातील अमरावती या मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात एकूण ३३ हजार ३४ मतांची मोजणी तीन फेऱ्यात करण्यात आली. यातील ७६८ मते अवैध ठरली असून ३२ हजार २६६ मते वैध ठरली आहेत. विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. दरम्यान, मतमोजणीच्या तीन फेरीअखेर शिवसेनेचे किरण सरनाईक यांना सर्वाधिक ८ हजार १६२ मते मिळाली आहेत.

तर, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांनी तिसऱ्या फेरीत ११०४ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. दोन फेऱ्यांमध्ये व्दितीय क्रमांकची मते मिळवणारे सेना बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या फेरीत माघारले. त्यांनी तिसऱ्या फेरी अखेर ४६६८ मते मिळाली.

शिक्षक संघटना या निवडणुकीत चांगल्याच माघारी गेल्याचे या उमेदवारांना मिळालेल्या मताहून दिसून आले आहे. सरनाईक याना पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळाली असली तरी विजयासाठी त्यांना आणखी झुंज द्यावी लागणार आहे. बाद फेरीत दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांची मदार अवलंबली असून ते किती मजल मारतात हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे. अंतिम निकाल बुधवारी स्पष्ट होणार आहे.


kiran saranik, shrikant deshpande
Marathwadad Graduate Election: मराठवाडा पदवीधरमध्ये धक्कादायक ट्रेंड, युतीच्या सतीश चव्हाणांची धाकधूक वाढली, प्रतापसिंह पाटील आघाडीवर

पहिल्या पसंतीच्या तीन फेरी अखेर

एकूण मते : ३३०३४

वैध मते : ३२२६६

अवैध मते : ७६८

विजयासाठी कोटा : १६,१३४

पहिले दहा उमेदवार

१) किरण सरनाईक शिवसेना ः ८१६२

२) श्रीकांत देशपांडे सेना बंडखोर ः ४६६८

३) अदिती पोहरे काँग्रेस ः ४६८८

४) सुरेश देवकर,शिक्षक भरती ः ३२३६

५) दत्तात्रय लहाने उबाठा ः २१५५

६) डॉ. संगीता शिंदे भाजप बंडखोर ः १९६४

७) चंद्रशेखर भोयर,भाजप बंडखोर ः १३७५

८) दिलीप कडू विमाशी ः २६७४

९) डॉ. प्रशांत विघे ः १२६७

१०) डॉ. अविनाश बोरडे वि जु कता ः १०२६

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com