

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे. उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज अवैध ठरला आहे.
यावरून शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी, यावरून गंभीर आरोप केले आहे. अल्पसंख्याक यांना निवडणूक हद्दपार करायचे अन् त्यांचीच मते घ्यायची, अशी कृती माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केल्याचा घणाघात चंद्रशेखर भोयर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज, त्यांच्या शपथपत्रातील प्रत्येक पानावर स्वाक्षरी नसणे आणि उच्च शैक्षणिक अर्हतेची माहिती अपूर्ण असणे, या तांत्रिक त्रुटींमुळे अवैध ठरवण्यात आला आहे. निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहेरोश यांनी म्हटले आहे.
शिक्षक (Teachers) महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी पत्रकार परिषद घेत, थेट माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. अल्पसंख्याक व्यक्तीला निवडणूक हद्दपार करायचे. त्यांची मते आपल्याला मिळवायची, अशी प्रवृत्ती माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केली. गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज अवैध ठरवला. अर्ज दाखल करताना, तो निर्णय निवडणूक अधिकारी तपासात असतो. त्रुटी असल्यावर अधिकाऱ्यांकडून त्रुटी पत्रक दिले जाते. तसे काही न करता, शेवटच्या क्षणी अर्ज अवैध ठरवण्यात आला, असा घणाघात चंद्रकांत भोयर यांनी केला.
अमरावती शिक्षक मतदारसंघात कधीही धार्मिक, जातीपातीचे राजकारण झाले नाही. दुर्दैव आहे की, अल्पसंख्याक, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्जच अवैध ठरवला. उमेदवारीपासून दूर केले. श्रीकांत देशपांडे यांनीच गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज अवैध ठरायला सांगितला, असा गंभीर आरोप चंद्रशेखर भोयर यांनी केला.
शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि अनिल काळे यांनी शासकीय निवासाचे प्रमाणपत्र आणि पोलिस तक्रारीबाबत हरकती घेतल्या होत्या. मात्र त्या अमान्य करण्यात आल्या. तसेच काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्या अर्जांवरील आक्षेपही फेटाळण्यात आले. त्यामुळे या प्रमुख उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.