

अमरावती : त्रिपुरा (Tripura) सांप्रदायिक हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावतीत (Amaravati_ १२ व १३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोठा हिंसाचार झाला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती पोलिसांनी आंदोलक व हल्लेखोरांवर कारवाई करत अटकेची कारवाई सुरु केली. त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने शहर पूर्वपदावर आले.
त्या घटनेनंतरही अमरावती पोलीस (Amarawati Police) अधिकच सतर्क झाले असून त्यांनी शहरात गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने शुक्रवारी रात्री ११ वाजता दरम्यान पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, डीसीपी विक्रम साळी, एसीपी पूनम पाटील व भारत गायकवाड यांच्यासह ठाणेदारांनी संचारबंदीचा आढावा घेतला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी या गस्तीच्या आढाव्याबाबत माहिती दिली आहे.
''अमरावतीकरांनो आम्ही आहोत, तुम्ही निर्धास्त राहा. असा आश्वासक संदेश देण्यासाठी सीपी, डीसीपी व एसीपींनी गुरुवारी रात्री शहरात पायदळ गस्त घातली. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. या दृष्टीने आवश्यकतेप्रमाणे संचारबंदीत सूट देण्यात येत आहे. मात्र, रात्री सक्त संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याची माहिती आरती सिंह यांनी दिली.
गस्तीदरम्यान ठाणेदारांनी, शहरातील पोलीस बंदोबस्त अलर्ट आहे किंवा नाही याची पाहणी केली. पेट्रोलिंग दरम्यान राजकमल चौक, चौक, हनुमाननगर, माता खिडकी, पटवा चौक, पठाण चौक, चांदणी चौक, हाथीपुरा, सक्करसाथ, शनीमंदिर, ट्रान्सफोर्टनगर, भाजी बाजार, रतनगंज, मसानगंज, नागोबा ओटा परिसरात पायदळ पेट्रोलिंग करून पाहणी केली. संबंधित भागातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. याचवेळी त्यांनी बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोस्तादरम्यान शस्त्रास्त्रांसह हजर राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.