Nagpur Congress : आंबेडकरांकडून काँग्रेसला दे धक्का; माजी मंत्र्यांचा वंचितमध्ये प्रवेश, पक्ष सोडताना म्हणाले,....

Anees Ahmed Join Vanchit Bahujan Aghadi :अनिस अहमद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनिस अहमद म्हणाले, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
Anees Ahmed congress
Anees Ahmed congressSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मध्य नागपूरमध्ये नागपूर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम समाजासाठी सोडण्यात यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मात्र ते फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला आहे. नुकताच त्यांचा मुंबईत प्रवेश झाला असून उद्या ते मध्य नागपूरमधून उमेदवारी दाखल करणार आहेत.

अनिल अहमद मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते पशुसंवर्धन मंत्री होते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडून पश्चिम नागपूर विधानसभेत जाणे त्यांच्या अंगलट आले. येथून देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून ते राजकारणाच्या बाहेर फेकल्या गेले होते.

महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला (Congress) पुन्हा चांगले दिवस आले असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा आपला मोर्चा मध्य नागपूरकडे वळवला. मात्र काँग्रेसने येथून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांना उमेदवारी दिली आहे. बंटी शेळके मागील निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांचा स्ट्राईक रेट बघून काँग्रेसने पुन्हा त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.

Anees Ahmed congress
Mahavikas Aghadi: दक्षिण आणि पूर्व नागपूरमध्ये पुन्हा बदल होणार ? इच्छुक गॅसवर

मुस्लिम समाजात असलेला रोष बघून अनिस अहमद (Anees Ahmad) यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित कडून लढल्यास काँग्रेसच्या बंटी शेळके यांची अडचण वाढू शकते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ हलबा आणि मुस्लिम बहूल आहे.

Anees Ahmed congress
Anil Deshmukh : 'एका उंदराला सगळे 'टरबूजा' म्हणायचे...'; अनिल देशमुखांच्या पुस्तकातील 'त्या' पानांवरील मजकूर काय?

अनिस अहमद यांनी सांगितले काँग्रेस सोडण्याचे कारण

अनिस अहमद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनिस अहमद म्हणाले, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंग सोडले आहे. फक्त एकाच समाजाला काँग्रेस व महाविकास आघाडीचे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व दिले. पूर्वी असे नव्हते.

सर्व समाजाचा व धर्माचा विचार केला जात होता. यात तेली, कुणबी, माळी, हिंदी भाषिक आणि मुस्लिमांचाही समावेश होता. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तो नसता तर येथेही काँग्रेसचा वेगळा उमेदवार बघायला मिळाला असता असे अनिस अहमद यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com