Nagpur News : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोडला आहे. काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आहे. गिरीश पांडव यांचे नावही जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुकांच्या आशा कायम आहे.
सायंकळापर्यंत काही तरी गुड न्यूज येईल याची प्रतीक्षा ते करीत आहे. पूर्व नागपूर विधानसभेसाठी काँग्रेसही आशेवर आहे. हे बघता नागपूर जिल्ह्यात काही धक्कादायक बदल होणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरुवातीपासून दक्षिण नागपूरवर दावा केला होता. जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांचे नावही जवळपास निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेसने दक्षिण नागपूरचा विषय ताणून धरला होता. अखेर ठाकरेंनी माघार घेतली.
दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत गिरीश पांडव यांचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ते मागील निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते.
दुसरीकडे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचे नावही राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. ते उद्या (मंगळावरी) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता.
त्या बदल्यात पूर्व नागपूर मतदारसंघ देण्यात आल्याची चर्चा आहे. आता हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीने परत मागून घेतला आहे. माजी मंत्री रमेश बंग यांनी येथून उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला आहे. त्यामुळे पूर्व नागपूर पुन्हा काँग्रेसला सोडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काँग्रेसनेही बंडाचा इशारा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. महानगर पालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला आहे. काँग्रेसच्या संगीता तलमले यांचेही नाव येथून आघाडीवर होते. मागील सहा महिन्यांपासून त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांनीही बंड करण्याचे ठरवले आहे. हे बघता पूर्व आणि दक्षिण नागपूरमध्ये काहीही होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.